Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
स्वप्नील जोशी पुन्हा एकदा निर्मात्याच्या भूमिकेत, सुशीला - सुजीत चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

स्वप्नील जोशी पुन्हा एकदा निर्मात्याच्या भूमिकेत, सुशीला - सुजीत चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

Letsupp 1 year ago

Sushila-Sujeet : लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीने (Swapneel Joshi) 2024 मध्ये एक वेगळी भूमिका बजावली आणि अभिनयाबरोबच निर्मिती विश्वात देखील पदार्पण केले होते. त्याने 2024 मध्ये नाच गं घुमा चित्रपटाची निर्मिती केली होती तर आता पुन्हा एकदा तो नवीन चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

स्वप्नील जोशी आता “सुशीला सुजीत” (Sushila-Sujeet) या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. स्वप्नील जोशीसह अभिनेता प्रसाद- मंजिरी ओक , संजय मेमाणे आणि निलेश राठी देखील या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. बडे कलाकार या चित्रपटासाठी निर्माते झाले असून आता या चित्रपटाची स्टार कास्ट काय असणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

सुशीला – सुजीत या चित्रपटाचा मुहूर्त देखील खास ठरला आहे. अभिनेता लेखक निर्माता जितेंद्र जोशीने चित्रपटाच्या मुहूर्तला हजेरी लावून चित्रपटाचा मुहूर्त खास केला. जितेंद्र जोशी हा या सगळ्यां निर्मात्याचा लाडका मित्र तर आहे आणि म्हणून लाडक्या जवळच्या मित्राच्या हातून या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला आहे.

आयुष्मान खुराना पुन्हा करणार धमाका, घेऊन येत आहे हॉरर-कॉमेडी 'थामा'

दगडूशेठ गणतीच्या बाप्पाच दर्शन घेऊन या नव्या चित्रपटाचा श्री गणेशा झाला आहे. चित्रपटाची स्टोरी काय असणार , कोण कलाकार यात दिसणार हे अजून तरी गुलदस्त्यात असलं तरी लवकरच या बद्दल गोष्टी समजतील असं कळतंय.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp