Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Abhijit Deepke : कॉक्रोज जनता पार्टी राजकारणात उतरणार का? काय म्हणाले संस्थापक अभिजित दिपके

Abhijit Deepke : कॉक्रोज जनता पार्टी राजकारणात उतरणार का? काय म्हणाले संस्थापक अभिजित दिपके

Letsupp 2 weeks ago

Abhijit Deepke : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके यांनी दिली आहे.

तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉक्रोज जनता पार्टी निवडणूक लढवणार का? याबाबत देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके (Abhijit Deepke) म्हणाले की, संपूर्ण देशात संघटन वाढवण्यावर चर्चा होणार आहे. जंतरमंतर मैदानावर झालेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला आहे. या आंदोलनानंतर आमच्या जबाबदाऱ्या देखील वाढल्या आहेत. त्यामुळे आता देशभरात संघटन वाढवण्यावर आमचा भर असणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी कॉक्रोज जनता पार्टी (CJP) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? यावर बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, सध्या पक्षाने राजकराणात येण्याचा कोणताही निणर्य घेतलेला नाही. यावर विचार करुन निर्णय घेऊ. निवडणूक आयोग, न्यायालय आणि मीडियावरील लोकांचा विश्वास कमी झाला आहे. तो विश्वास पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी आंदोलनाची गरज आहे.

E20 पेट्रोलवरून नवा वाद, SIAM च्या अहवालात इंजिन खराब होण्याचा दावा; सरकारची प्रतिक्रिया काय?-

आज अनेक आमदार, खासदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असल्याने लोकांचा विश्वास राजकारणातून कमी होताना दिसत आहे. यामुळेच आमच्या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळाला असेही यावेळी अभिजीत दिपके म्हणाले.

नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोज जनता पार्टीसह हजारो विद्यार्थांनी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करत पंतप्रधान मोदी यांच्याकडे राजीनामा पाठविला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp