Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अहिल्यानगर, पुणेसह 'या' जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; जाणून घ्या अंदाज

अहिल्यानगर, पुणेसह 'या' जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; जाणून घ्या अंदाज

Letsupp 3 days ago

Maharashtra Rain Alert : संपूर्ण राज्यात आता पावसाचा जोर वाढणार असून आजपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

या दरम्यान विजांचा कडकडाटासह 30 ते 50 ताशी किमी वेगाने वारे वाहणार असल्याची देखील माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हवामानानुसार, मुंबई (Mumbai) , ठाणे, सोलापूर, पुणे (Pune Rain) , गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आजपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसह उकाडा सहन करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आज या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस ?

तर दुसरीकडे संभाजीनगर, नाशिक, जळगाव, पालघर, हिंगोली, जालना, नांदेड, वाशीम, यवतमाळ, अमरावती, ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, वर्धा, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

बुध आणि चंद्र ‘उत्तरा फाल्गुनी’ नक्षत्रात ; आज ‘या’ 4 राशींना मिळणार नशिबाची साथ, होणार संपत्तीत वाढ

जळगावात धो धो पाऊस

तर ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतल्यानंतर जळगावमध्ये रात्री पावसाने हजेरी लावली. काल रात्री जळगावा झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे आणि सुसाट वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp