Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमेरिकेने 1000 मिसाईल लॉक्ट अँड लोडेड ठेवलेत; डोनाल्ड ट्रम्प इराणवर इतके का संतापले?

अमेरिकेने 1000 मिसाईल लॉक्ट अँड लोडेड ठेवलेत; डोनाल्ड ट्रम्प इराणवर इतके का संतापले?

Letsupp 1 month ago

मेरिका आणि इराण यांच्यातील (War) तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच इराणसोबतचा शांती करार रद्द झाल्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकेची 1000 मिसाईल लॉक्ट अँड लोडेड आहेत.

इराणला धमकी देत त्यांनी जर इराणने त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला किंवा तसा कट रचला तर अमेरिकेचे लष्कर वर्षभर इराणच्या प्रत्येक भागात सतत हल्ला करण्यासाठी सज्ज आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'जर इराण सरकार जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका इराणच्या सर्व भागांना बेचिराख करून टाकेल. याचा आदेश आधीच देण्यात आला आहे. अमेरिकेचे सैन्य पूर्ण तयार आहे.

Video : राष्ट्रवादी मनसे अन् ट्रम्प यांच्या नेतृत्वात…,पक्षांंतराच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी

ट्रम्प यांचं हे वक्तव्य अशावेळी आलं आहे ज्यावेळी अमेरिका आणि इराण यांच्या पुन्हा संघर्ष शिगेला पोहचला आहे. जूनमध्ये दोन्ही देशांनी मोठ्या संघर्षानंतर एक तातपुरता युद्धविराम केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लष्करी कारवाईनंतर पुन्हा या भागातील वातावरण बिघडलं आहे.

नुकतेच ट्रम्प यांनी नाटो बैठकीवेळी आपण इराणच्या हिट लिस्टवर आहोत असं सांगितलं होतं. या यादीत आपण सर्वोच्च स्थानावर आहोत. ही माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेकडून मिळाली असल्याचं सांगण्यात आलं. इराण त्यांच्याविरूद्ध कट रचत आहे असा दावा त्यांनी केला. त्यानंतर अमेरिकी लष्कराला अजून कडक लष्करी कारवाईची तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp