Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

Letsupp 18 hrs ago

IND vs AFG : बीसीसीआयने अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि एक कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. दुसरीकडे रोहित आणि विराट जानेवारी 2026 नंतर मैदानात दिसणार आहे.

भारत-अफगाणिस्तान दौऱ्यातील एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून मुल्लानपूर (न्यू चंदीगड) येथे खेळला जाईल. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 14, 17 आणि 20 जून रोजी धर्मशाला, लखनौ आणि चेन्नई येथे खेळली जाईल.

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय आणि एक कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

भारताचा कसोटी संघ

शुभमन गिल (कर्णधार), जयस्वाल, के.एल. राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक).

अफगाणिस्तानविरुद्धचा एकदिवसीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित, कोहली, श्रेयस (उपकर्णधार), के.एल. राहुल (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी वेळापत्रक

भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिली कसोटी (6-10 जून)

एकदिवसीय मालिका वेळापत्रक

पहिला एकदिवसीय (14 जून - धर्मशाला)

दुसरा एकदिवसीय (17 जून - लखनौ)

तिसरा एकदिवसीय (20 जून - चेन्नई)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp