Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना किती वर्षांची शिक्षा? श्याम मानव स्पष्टच म्हणाले

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना किती वर्षांची शिक्षा? श्याम मानव स्पष्टच म्हणाले

Letsupp 3 months ago

Shyam Manav on Ashok Kharat Controversy : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात चर्चेत आहे. अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात काही राजकीय नेत्यांची नावे देखील समोर येत असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर आता या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत रुपाली चाकणकर खरात प्रकरणात आरोपी होऊ शकतात का ? यावर देखील आपली भूमिका स्पष्ट केली.

लेट्सअप मराठीला (Letsupp Marathi) दिलेल्या मुलाखतीमध्ये श्याम मानव (Shyam Manav) म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अत्यंत कडक आहे. या कायद्यामध्ये ज्या गोष्टी प्रतिबंधित केलेल्या आहेत त्यांचा प्रचार आणि प्रसार करणं हाही कायद्याने गुन्हा आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहाय्य करणे हा देखील या कायद्याअंतर्गत गुन्हा आहे आणि हा गुन्हा समान गुन्हा आहे. यात सहा महिन्यापासून सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. अशोक खरातच्या (Ashok Kharat Controversy) या सर्व प्रकरणामध्ये तीन ठिकाणी जादूटोणा कायदा लागू होतो. या कायद्याच्या अकराव्या कलमानुसार, एखादी व्यक्ती मी कोणत्यातरी देवाचा अवतार आहे असं सांगून जर शारीरिक संबंध ठेवत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. त्यातला दुसरा पार्ट असा आहे की, एखादी व्यक्ती दैवी शक्ती माझ्यामध्ये आहे आणि तुला दैवी शक्तीने मी मूल करुन देतो असं म्हणत असेल आणि शारीरिक संबंध ठेवत असेल तर तो देखील कायद्याने गुन्हा आहे. तसेच चमत्काराचा प्रयोग प्रदर्शित करुन आर्थिक प्राप्ती करणे हा देखील कायद्याने गुन्हा आहे. हे तिन्ही कलमे खरातला लागू होतात.

विजांच्या कडकडाटासह आज मुसळधार पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

या तिन्ही कलमांमध्ये खरातला सहाय्य कोणी कोणी केले आहे. ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरामध्ये हा प्रकार घडला असल्याने ईशान्येश्वर मंदिराचं सगळेच्या सगळे ट्रस्टी याला लागू होतात. जे जे लोक बायकांना तिथे घेऊन आलेत ते लोक देखील या गुन्ह्यात सहभागी आहे. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) जेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या तेव्हा त्यांनी स्त्री शोषण प्रकरणात पत्रकाराला फोन करुन धमकावले होते याचा अर्थ असा की ते यात डायरेक्ट सहभागी आहे. त्यामुळे त्यांना देखील या प्रकरणात समान शिक्षा होते. त्यांना अशोक खरात तितकीच शिक्षा होऊ शकते असं लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्याम मानव म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp