Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Awarapan 2 ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; 12 व्या दिवशी 3.21 कोटींची कमाई

Awarapan 2 ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; 12 व्या दिवशी 3.21 कोटींची कमाई

Letsupp 1 week ago

Awarapan 2 : विशेष भट्ट यांचा ‘आवारापन 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत असून, 12 व्या दिवशी चित्रपट 150 कोटींच्या (NBOC) टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या चित्रपटाने काल 3.21 कोटींची कमाई केली, ज्यामुळे त्याचे भारतातील एकूण निव्वळ संकलन (Nett India Collection) 147.98 कोटींवर पोहोचले आहे.

इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत आणि चित्रपटाची यशस्वी घोडदौड अविरत सुरू आहे.

‘आवारापन 2’ हा 2026 मधील पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. तसेच, या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपटांच्या यादीत तो आपली पकड मजबूत करत असून लवकरच 150 कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या तयारीत आहे. नितीन कक्कर दिग्दर्शित आणि बिलाल सिद्दीकी व विशेष भट्ट लिखित या चित्रपटात इम्रान हाश्मी, दिशा पटानी, शबाना आझमी, पूरण गब्बी, सुविंदर विकी आणि अनिरुद्ध रावल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘हैवान' मध्ये सैफ अली खानचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार; स्वतः केले स्टंट

मुकेश भट्ट आणि विशेष फिल्म्सद्वारे प्रस्तुत, विशेष भट्ट यांच्या निर्मितीखाली आणि दीपेश शाह व सुनामन सूद यांच्या सह-निर्मितीखाली बनलेला ‘आवारापन 2’ सध्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे संपूर्ण भारतातील वितरण ‘पेन मारुधर’ (Pen Marudhar) द्वारे केले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp