Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भाजपच्या नगरसेविकेची धमकी; मी 'त्याला' जिवंत जाळणार, नेमकं प्रकरण काय?

भाजपच्या नगरसेविकेची धमकी; मी 'त्याला' जिवंत जाळणार, नेमकं प्रकरण काय?

Letsupp 2 weeks ago

BJP Corporator Shailaja More's Threat: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी ठेकेदाराबाबत केलेल्या आक्रमक वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

संबंधित ठेकेदाराने कामात सुधारणा केली नाही, तर त्याला विद्युत दाहिनीत जिवंत जाळण्याची धमकीच मोरे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडमधील विविध स्मशानभूमींमध्ये असलेल्या विद्युत दाहिन्या वारंवार बंद पडत असल्याचा मुद्दा मोरे यांनी सभागृहात उपस्थित केला. या दाहिन्यांच्या दुरुस्तीबाबत महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांचा संताप स्पष्टपणे दिसून आला.

Riya Ahir : पोलिसांना भिडणारी 'व्हायरल गर्ल' रिया अहिर राजकारणात प्रवेश करणार ?

या समस्येवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करत मोरे यांनी संबंधित ठेकेदारांची नावे जाहीर करण्याची मागणी केली. यापुढे या विषयावर केवळ चर्चा करून उपयोग नाही, असे सांगत त्यांनी ठेकेदारांनी कामात सुधारणा न केल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. याचवेळी त्यांनी, "मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार," असे वक्तव्य केले.

दरम्यान, बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवरूनही आधीच वाद निर्माण झाला होता. ही सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला होता. त्यामुळे मोरे यांनी हे वक्तव्य केले, त्यावेळी विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहात उपस्थित नव्हते.

मोठी बातमी! जरांगे पाटील उपोषण सोडणार?, शिष्टमंडळातील प्रसाद लाड भेटीला, काय केलं आवाहन?

मोरे यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी भाजपकडून सभागृहात कोणतीही ठोस प्रतिक्रिया उमटली नसली, तरी त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना कायद्याच्या चौकटीचे भान ठेवणे गरजेचे असताना थेट हिंसक धमकीची भाषा वापरली जात असल्याने लोकप्रतिनिधींच्या वर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp