Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Bhutam Bhayam : लालबागच्या राजाच्या पावन भूमीचे दर्शन घेऊन 'भूतम भयम्'च्या प्रमोशनचा आरंभ

Bhutam Bhayam : लालबागच्या राजाच्या पावन भूमीचे दर्शन घेऊन 'भूतम भयम्'च्या प्रमोशनचा आरंभ

Letsupp 3 days ago

Bhutam Bhayam : लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला असून, या शुभप्रसंगी बाप्पाच्या चरणांचे पूजन करून प्रत्यक्ष मूर्ती घडविण्याच्या पवित्र कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

याच मंगल प्रसंगाचे औचित्य साधत, येत्या २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित 'भूतम भयम्' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या यशासाठी कलाकार आणि टीमने लालबागच्या राजाच्या पावन स्थळी जाऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी चित्रपटातील सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, नील साळेकर आणि दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर यांनी लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. या प्रसंगी लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करत संपूर्ण टीमला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रद्धा, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या भेटीमुळे 'भूतम भयम्'च्या यशस्वी प्रवासाची मंगल सुरुवात झाली आहे.

दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर म्हणाले, 'माझं बालपण लालबाग परिसरातच गेलं. लालबागच्या राजाबद्दलची श्रद्धा आणि जिव्हाळा माझ्यासाठी खूप खास आहे. आज याच पवित्र आणि मंगलमय स्थळी माझ्या 'भूतम भयम्' चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण होत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत भावूक आणि अभिमानाची बाब आहे. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आम्ही चित्रपटाच्या यशासाठी आशीर्वाद मागितले आहेत. गणरायाच्या कृपेने आणि प्रेक्षकांच्या प्रेमाने हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल, असा मला ठाम विश्वास आहे.''

पंढरपुरमध्ये रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण; भाजपकडून आंदोलकांवर कारवाईचीही मागणी

या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे यांनी केली असून, कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी रामचंद्र अरुण गांवकर यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp