Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Commonwealth Games 2026:  अस्मिता डेने जिंकले सुवर्णपदक ! ज्यूडोमध्ये एेतिहासिक कामगिरी

Commonwealth Games 2026: अस्मिता डेने जिंकले सुवर्णपदक ! ज्यूडोमध्ये एेतिहासिक कामगिरी

Letsupp 3 weeks ago

Commonwealth Games 2026: ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 (Commonwealth Games 2026) मध्ये भारताच्या अस्मिता डे (Asmita Dey ) हिने महिला 48 किलो वजनी गटातील ज्यूडो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

अंतिम सामन्यात तिने कॅनडाच्या हायडी क्वाच (Heidi Quach) हिचा ‘गोल्डन स्कोअर’मध्ये पराभव करत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.

त्रिपुरातील 23 वर्षीय अस्मितासाठी अंतिम सामना सुरुवातीला कठीण ठरला. सामन्याच्या प्रारंभी तिने एक युको गुण गमावला आणि त्यानंतर तिला पेनल्टी मिळाला. त्यामुळे कॅनडाच्या हायडी क्वाचने सामन्यावर सुरुवातीला वर्चस्व मिळवले होते. मात्र, अस्मिताने हार न मानता आक्रमक खेळ करत पुनरागमन केले. चार मिनिटांच्या नियोजित वेळेतील मध्यंतरानंतर तिने शानदार खेळी करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.

नियोजित वेळ संपेपर्यंत दोन्ही खेळाडूंना निर्णायक गुण मिळवता आले नाहीत. त्यामुळे सामना ‘गोल्डन स्कोअर’मध्ये गेला. या टप्प्यात पहिला गुण मिळवणारा खेळाडू विजेता ठरतो. दबावाखालीही शांतपणे खेळत अस्मिताने अतिरिक्त वेळेत निर्णायक आक्रमण केले आणि आणखी एक युको गुण मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले.

अस्मिताच्या या विजयाने तिच्या संपूर्ण स्पर्धेतील दमदार कामगिरीवर शिक्कामोर्तब झाले. अंतिम सामन्यात सुरुवातीला पिछाडीवर असतानाही तिने उल्लेखनीय जिद्द, संयम आणि उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य दाखवत कॅनडाच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले आणि भारताच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णाची भर घातली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp