Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
CWG 2026: भारताने आतापर्यंत 39 पदके जिंकली; पदकांच्या यादीत कितव्या स्थानावर झेप?

CWG 2026: भारताने आतापर्यंत 39 पदके जिंकली; पदकांच्या यादीत कितव्या स्थानावर झेप?

Letsupp 6 days ago

Commonwealth Games 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 (Commonwealth Games 2026) यंदा भारतासाठी खास राहिला आहे. कारण शनिवारी बॉक्सिंग क्रीडा प्रकारात भारताने दहा पदके जिंकली आहेत. भारतीय बॉक्सरांनी एकच दिवसात सात सुवर्णपदक जिंकले आहेत.

त्यामुळे पदकांच्या यादीत भारताने मोठी झेप घेतली आहे. शुक्रवारी भारत पदकांच्या यादीत थेट दहाव्या स्थानावर होता. एकाच दिवसात भारताने थेट चौथ्या क्रमांकावर गरुडझेप घेतलीय.


Spider-Man: Brand New Day : हॉलिवूड चित्रपटाची भारतात तीन दिवसांत सर्वाधिक कमाई; दोनशे कोटींचा टप्पा ओलांडला


बॉक्सरांनी दमदार कामगिरी करत इतिहास रचला

शनिवारी भारतीय बॉक्सरांनी दमदार कामगिरी करत इतिहास रचला. भारताने बॉक्सिंग स्पर्धेत तब्बल 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. ज्युडो आणि पॅरा ट्रॅक अँड फील्डमधील खेळाडूंनीही उल्लेखनीय यश मिळवले. महिला बॉक्सरांनी भारताच्या यशात सिंहाचा वाटा उचलत पाच सुवर्णपदके जिंकली. साक्षी चौधरी, जॅस्मिन लँबोरिया, अरुंधती चौधरी, प्रीती पवार आणि प्रिया घनघास यांनी सुवर्णपदक पटकावत भारताचा दबदबा सिद्ध केला.


भारताच्या खात्यात 13 सुवर्ण

पुरुष गटात सचिन सिवाच आणि अंकुश पंघाल यांनी सुवर्णपदके जिंकून भारताच्या पदकसंख्येत भर घातली. या शानदार कामगिरीमुळे भारताने कॉमनवेल्थ गेम्समधील बॉक्सिंग स्पर्धेतील आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केलीय. या यशाच्या जोरावर भारताने पदकतालिकेत मोठी झेप घेत दहाव्या स्थानावरून थेट चौथ्या क्रमांकावर मजल मारली आहे. भारताच्या खात्यात आता 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 39 पदके जिंकली आहेत.


पदकांमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

पदकांच्या यादीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने 65 सुवर्ण, 41 रौप्य आणि 52 कांस्य अशी एकूण 158 पदके जिंकली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड असून त्यांच्या खात्यात 26 सुवर्ण, 41 रौप्य आणि 35 कांस्य (ब्रॉंझ), अशी 102 पदके आहेत. तिसऱ्या स्थानावर कॅनडा आहे. त्यांनी 18 सुवर्ण, 20 रौप्य आणि 21 कांस्य, अशी 59 पदके जिंकली आहेत. भारत चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या खाली स्कॉटलंड आहे. स्कॉटलंडने 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 17 कांस्य, अशी 38 पदके जिंकली आहेत.

मला राजकारणातून निवृत्ती घ्यावी वाटते पण…, भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या विधानाने खळबळ

इतर देशांची कामगिरी
नायजेरियाने 10 सुवर्ण, 7 रौप्य आणि 7 कांस्य, अशी 24 पदके जिंकली आहेत. जमैकाच्या खात्यात 10 सुवर्ण, 3 रौप्य आणि 5 कांस्य, अशी 18 पदके आहेत. न्यूझीलंडने 8 सुवर्ण, 11 रौप्य आणि 9 कांस्य, अशी 28 पदके मिळवली आहेत. वेल्सने 8 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्य, अशी 30 पदके, तर मलेशियाने 8 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य, अशी 14 पदके जिंकली आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp