Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का? उपोषणानंतर सोनम वांगचुक स्पष्टच म्हणाले

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का? उपोषणानंतर सोनम वांगचुक स्पष्टच म्हणाले

Letsupp 1 month ago

Sonam Wangchuk On Dharmendra Pradhan Resignation : नीट पेपर फुटी विरोधात 28 जूनपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. वांगचुक यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर कोणतेही गुन्हे दाखल न करणे, नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देणे आणि नीट प्रकरणात संसदेत चर्चा करण्यावर केंद्र सरकारने सहमती दर्शवल्यानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले आहे. मात्र आता देखील शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर केंद्र सरकारने कोणताही शब्द दिला नसल्याची माहिती देखील वांगचुक यांच्याकडून देण्यात आली आहे.

उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सोनम वांगचुक यांनी सांगितलं की, 26 व्या दिवशी मी तुम्हाला एक विशेष बातमी सांगू इच्छितो. आता रात्रीचे साधारण 12.30 वाजत आहेत. काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह येथे आले होते. तसेच लडाखच्या अ‍ॅपेक्स बॉडीचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या सुमारे 65 खासदारांनी येऊन आणि स्वाक्षऱ्या करुन मला उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच नीट पेपर फुटी आणि परीक्षा पद्धतीवर चर्चा केली जाईल असे आश्वसन त्यांनी दिले आणि सरकारच्या मंत्र्यांनीही हेच आश्वसन दिले असं सोनम वांगचुक म्हणाले.

पुढे बोलताना सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी सरकारने मान्य केलेल्या मागण्या आणि धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. सोनम वांगचुक म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून मला सरकारकडून स्पष्ट आणि लेखी आश्वसन हवे होते. यासाठी दोन दिवस गेले, त्यामुळे मला आणखी दोन दिवस उपोषणाला बसावे लागले. मी आणखी काही दिवस बसलो असतो पण अखेर आज त्यांनी मला लेखी आश्वासन दिले आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलीस गुन्हे दाखल करणार नाहीत. तसेच 20 रोजी झालेल्या मार्चमध्ये सहभागी झालेल्यांवरही कोणताही कारवाई केली जाणार नाही. संसदेत पेपर फुटी आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारांवर चर्चा करण्याचे आश्वासन सरकारने दिले असल्याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये वांगचुक यांनी दिली. तर नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य ती भरपाई देण्याबाबत सरकार विचार करत आहे असं देखील वांगचुक म्हणाले.

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का?

या व्हिडिओमध्ये बोलताना वांगचुक म्हणाले की, आता तुम्ही नक्कीच विचाराल की, धर्मेंद्र प्रधान जी यांच्या राजीनाम्याचे काय झाले? पहिली गोष्ट म्हणजे हे कधी होईल याबाबत ते मला सध्या तरी कोणतेही आश्वासन देऊ शकलेले नाहीत मात्र संसदेच्या सभागृहात यावर चर्चा नक्कीच होईल. माझ्यासमोर दोनच मार्ग होते. एक तर मी आठवडे आठवडे उपोषणाला बसून राहावे आणि कदाचित त्यातच माझा अंत व्हावा. परंतु तुमच्यापैकी हजारो लोक गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून मला सांगत आहेत की, तुमचा जीव महत्त्वाचा आहे, लढा पुढे नेण्यासाठी तुमचे जिवंत राहणे गरजेचे आहे.

पेपरफुटी संघटीत गुन्हा, कठोर कायदा आणा अन्… रोहित पवारांची मोठी मागणी-

माझे विचार थोडे वेगळे आहेत. जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्याने आपले किंवा मुलांचे नुकसान होणार नाही उलट सरकारचेच नुकसान होईल. हा छोटासा मुद्दा न सोडवता सरकार स्वत:चेच नुकसान करत असेही या व्हिडिओमध्ये वांगचुक म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp