Dailyhunt
दु:खद! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

दु:खद! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

Letsupp 3 weeks ago

नाशिक जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. (Nashik) विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. साकोरा इथं ही दुर्दैवी घटना घडली आहे. पांझण नदीवरीलवीजपंप दुरुस्ती करतेवेळी ही घटना घडली आहे.

शिरीष भगवान पठाडे (वय -42) व जगदिश तुकाराम खैरनार अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

पाण्यात अचानक विजपुरवठा सुरु झाल्याने दोन शेतकऱ्यांना बसला विजेचा धक्का पांझण नदीपात्रातील विजपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे घडली. पांझण नदीपात्रात गेल्या काही वर्षांपासून पन्नास ते साठ शेतकऱ्यांचे विजपंप कार्यरत आहेत. आज साकोरा येथील शिरीष भगवान पठाडे (42) व जगदिश तुकाराम खैरनार (36) हे दोघे तरुण शेतकरी पांझण नदीवर वीज पंप सुरु करण्यासाठी गेले.

नाशिक TCS प्रकरण; धार्मिक सक्ती, मानसिक छळ आणि 'पत्नीला पाठवण्याच्या वक्तव्यामुळे देशभरात खळबळ

विजपंप पाण्याबाहेर असल्याने तो पाण्यात खेचण्याच्या प्रयत्नात पाण्यात अचानक विजपुरवठा सुरू झाल्याने दोघा शेतकऱ्यांना विजेचा तीव्र झटका बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचलं, खेळताना बुडून चार लहानग्यांचा मृत्यू नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात हृदयद्रावक घटना घडली असून नाल्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत मुलांचे वय 7 ते 10 वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, देगलूर नाका भागात खोदकामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. परिसरातील काही मुलं खेळण्यासाठी त्या ठिकाणी गेली असता, खेळता खेळता ते पाण्यात पडले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चारही मुलं बुडाल्याची भीषण घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. चारही मुलांना बाहेर काढण्यात आले असले तरी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp