Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एकीकडे डिफेंडर गाडी पण जरांगेंना उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते? हाकेंना वेगळाच संशय

एकीकडे डिफेंडर गाडी पण जरांगेंना उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते? हाकेंना वेगळाच संशय

Letsupp 1 week ago

Lakshman Hake on Manoj Jarange strike and also quetion on his defender : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी सरकारकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आंतरवाली सराटी येथे पाठवण्यात आलं होतं.

मात्र, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी निषेध नोंदवला. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जोरदार टीका केली.

नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके?

प्रसाद लाड, शंभूराज देसाई, विखे पाटील जेवढे नेते मनोज जरांगेंना भेटायला जात आहेत त्यांचा त्यामागे काहीतरी पॉलिटीकल इंटरेस्ट आहे. त्यामुळे सरकारने आंतरवाली सराटीला महाराष्ट्राची नागपूरनंतरची उपराजधानी जाहीर करा तिथे एक निवासी मंत्री द्या. त्यांना तिथे मुक्कामाला ठेवा म्हणजे सरकारचा तिथे जाण्याचा येण्याचा वेळ वाचेल. तसेच आंतरवलीमध्ये एक लाख लोक जमले आहेत वैगेरे हे सर्व फसवण्याचं काम आहे.

जरांगे खालावले, मराठे पेटले! बीड-जालन्यात जाळपोळीसह मोठा राडा!

तसेच जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस असला तरी ते दहा दिवस उपोषण करतात. त्यात त्यांची ती लाल गोधडी आणि त्यांचं उपोषण हे एक कायमचं समीकरण आहे. पण त्यांना ती लाल गोधडीच का लागते. एकीकडे ते डिफेंडर गाडीत फिरतात. तो काय प्रामाणिक उपोषण करणार. त्यामुळे याची देखील चौकशी व्हायला हवी.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp