Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Glenn Maxwell Retirement : मोठी बातमी, ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Glenn Maxwell Retirement : मोठी बातमी, ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Letsupp 2 days ago

Glenn Maxwell Retirement : ऑस्ट्रेलियासाठी 286 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी धावांचा डोंगर उभारला आहे.

त्याने ऑस्ट्रेलियासाठी आपला शेवटचा सामना 2026 च्या टी20 विश्वचषकादरम्यान खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत तो बिग बॅश लीग खेळत राहणार असल्याची देखील त्याने माहिती दिली.

ग्लेन मॅक्सवेलची निवृत्ती

मॅक्सवेलने 'द फायनल वर्ड' (The Final Word) पॉडकास्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. 2012 मध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांने ऑस्ट्रेलियासाठी (Australia) 14 वर्ष क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. मॅक्सवेलने (Glenn Maxwell) सांगितले की, अलीकडील टी20 विश्वचषकानंतर त्याने आपल्या भविष्याबाबत सविस्तर चर्चा केली होती. तसेच ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने निवृत्तीसाठी कोणताही दबाव टाकला नव्हता आणि त्याच्यासाठी संघात परतण्याचे दरवाजे खुले ठेवले होते असं देखील त्याने यावेळी सांगितलं.

पुढे या पॉडकास्टवर बोलताना मॅक्सवेलने सांगितले की, त्याला मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) वर निवृत्त होण्याची इच्छा होती, परंतु ती संधी मिळू शकली नाही. 'मला MCG वर निरोप घेण्याची आशा होती. असे असले तरी, ऑस्ट्रेलियन संघ ज्या दिशेने वाटचाल करत आहे, ती मला पूर्णपणे समजते. बदल अपरिहार्य आहेत. 2028 च्या ऑलिम्पिकचा विचार करता, त्यांना पुढील 12 ते 24 महिन्यांत तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी द्यायची आहे, जेणेकरून त्यांना अशा दबावाचा अनुभव घेता येईल जो 'बिग बॅश लीग' (BBL) सामन्यांमध्ये मिळणे शक्य नाही.'

चंद्र, केतू आणि गुरू एका राशीत ; मेष राशीसह 'या' राशींना होणार फायदा -

ग्लेन मॅक्सवेलने ऑगस्ट 2012 मध्ये शारजाह येथे अफगाणिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर, त्याने ऑस्ट्रेलियासाठी 130 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 2,897 धावा केल्या. त्याने 5 शतके आणि 12 अर्धशतके झळकावली. गोलंदाजीमध्येही मॅक्सवेल प्रभावी ठरला आणि त्याने 51 विकेट्स घेतले. त्याने 149 एकदिवसीय सामन्यांत 33.81 च्या सरासरीने एकूण 3,990 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मॅक्सवेलने 4 शतके आणि 23 अर्धशतके झळकावली आहेत. मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासह दोन एकदिवसीय विश्वचषक आणि एक टी20 विश्वचषक जिंकला असून, संघाच्या या यशात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp