Dailyhunt
इराणसोबत चर्चा निष्फळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन

इराणसोबत चर्चा निष्फळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन

Letsupp 1 week ago

राण आणि अमेरिकेमध्ये चर्चेची पहिली फेरी (War) निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. इराण युद्ध आणि भारत-अमेरिका संबंधावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमेरिका आणि इराण या दोन देशांदरम्यान युद्ध थांबवण्यासाठी चर्चेची पहिली फेरी पार पडली. पाकिस्तानमध्ये पार पडलेली ही पहिली फेरी निष्फळ ठरली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींशी चर्चा केल्याने त्याला महत्व प्राप्त होत आहे. गेल्या महिन्याभरात नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात हा दुसरा फोन आहे. अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर आता दुसऱ्या फेरीसाठी प्रयत्न सुरु आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी 16 एप्रिलला होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सूत्रांच्या हवाल्यानं बातमी मिळत आहे. चर्चेची दुसरी फेरी ही इस्लामाबाद किंवा जिनेव्हामध्ये होण्याची शक्यता आहे. युद्धविरामाची मुदत संपण्याआधी पुन्हा चर्चेची शक्यता आहे. पाकिस्तान, तुर्कीए, इजिप्त चर्चेसाठी मध्यस्थी करत आहेत. चर्चा पुन्हा सुरू करण्याचा संयुक्त राष्ट्रांचाही आग्रह असल्याची माहिती मिळत आहे. इराण चर्चेसाठी पुन्हा उत्सुक असल्याचं इराणनं फोन करुन सांगितल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

शांततेची संधी हुकली! इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण चर्चा अपयशी, युद्ध पुन्हा सुरू होणार?

इराण चर्चेसाठी पुन्हा तयार असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराण अमेरिकेसोबत करार करण्यासाठी उत्सुक असल्याचा ट्रम्प यांनी दावा केला. इराण सर्व अटींवर सहमत नाही झालं तर करार होणार नाही असंही ते म्हणाले. इराण जवळ कधीच आण्विक हत्यार राहणार नाहीत अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली. इराण आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यावर आता पुढे काय याची चिंता या दोन्ही देशांना आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीचाही प्रश्न चिघळत आहे. त्यातच रशियाने आता युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याचं सुतोवाच केलं आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हारोव्ह यांनी चर्चा करून युद्धासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे. शांतीवार्ता पुढे चालू ठेवण्यासाठी पाच देशांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी आता इराणकडून करण्यात आली आहे. सौदी अरेबिया, यूएई, कतार, बहारिन, जॉर्डनकडे ही भरपाईची मागणी करण्यात आली आहे. अमेरिकेला साथ देणाऱ्या देशांनी नुकसान भरपाई द्यावी, असं इराणनं म्हटलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp