Dailyhunt
जे कुठलं नाव येईल त्याला आम्ही सहकार्य करु; ठाकरे गटाबद्दल शरद पवार काय म्हणाले?

जे कुठलं नाव येईल त्याला आम्ही सहकार्य करु; ठाकरे गटाबद्दल शरद पवार काय म्हणाले?

Letsupp 6 days ago

ला राज्यसभेवर पाठवण्यासाठी (MVA) महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी सहकार्य केलं. उद्या जेव्हा विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून जे कुठलं नाव येईल त्याला आम्ही सहकार्य करु. आमचा पाठिंबा असेल पत्रकरांशी अनऔपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी ही आपली भावना बोलून दाखवली.

मला राज्यसभेवर पाठवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीने सहकार्य केलं. भविष्यात विधान परिषदेच्यावेळी ठाकरे जो कुठला उमेदवार देतील त्याला पाठिंबा देऊ असं शरद पवार म्हणाले.

विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे कोणाला संधी देणार? की ते स्वत: पुन्हा सभागृहात जाणार हे अद्याप ठरलेलं नाही. शरद पवार यांचा येत्या 6 एप्रिलला राज्यसभेचा शपथविधी आहे. त्यासाठी ते दिल्लीला रवाना होणार आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा पोटनिवडणुकांची चर्चा आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी सर्वच पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

राष्ट्रवादीतील वादावर पार्थ पवार पहिल्यांदा बोलले; सुनील तटकरे, पटेलांवर काय म्हणाले ?

अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवार असतील. पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा मिळावा यासाठी काल सुनेत्रा पवार यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. बारामती आणि राहुरी या दोन्ही विधानसभा पोटनिवडणुका लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसने या दोन्ही विधानसभा मतदार संघात उमेदवार देणार आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने बारामती विधानसभा पोटनिवडणुकी बाबत अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. "मला असं वाटतं की, सर्वच पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी सर्वांना विनंती आहे की, ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी. याआधी महाराष्ट्रात बिनविरोध पोटनिवडणूक झाली आहे" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp