Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम शिंदेंच्या भेटीगाठी; राजकीय चर्चांना उधाण

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम शिंदेंच्या भेटीगाठी; राजकीय चर्चांना उधाण

Letsupp 3 weeks ago

Ram Shinde’s meetings and interactions : आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनीही जिल्हा दौरा सुरू करत आज माजी खासदार यशवंत गडाख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

त्यानंतर अहिल्यानगर येथील सर्किट हाऊसमध्ये माजी आमदार पांडुरंग अभंग व भानुदास मुरकुटे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून विविध स्तरावर चर्चांना उधाण आले आहे. जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात जिल्हा बँकेची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच राजकीय समीकरणे जुळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या सर्व घडामोडींबाबत अधिकृतपणे कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही.

माध्यमांशी बोलताना प्रा. राम शिंदे म्हणाले, “जिल्ह्यातील सामाजिक, सहकारी आणि राजकीय विषयांवर ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी या भेटी होत आहेत. अहिल्यानगर हा सहकाराचा जिल्हा असून ही परंपरा कायम राहावी, यासाठी विविध बाबींचा आढावा घेत आहे.”

सिस्पे घोटाळ्यातील मुख्य आरोपी राहुल काळोखेला इंटरपोलमार्फत फिजीमध्ये अटक; पीडितांच्या न्यायाच्या लढ्याला बळ

जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, बँकेचे ठराव झाले असले तरी प्रारूप मतदार यादी अद्याप निश्चित झालेली नाही. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे पॅनेल उभारणी किंवा निवडणुकीच्या रणनीतीबाबत बोलणे सध्या योग्य ठरणार नाही. योग्य वेळी सर्व भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बीडकडे जात असताना काही काळ अहिल्यानगर सर्किट हाऊसमध्ये थांबल्या. यावेळी प्रा. राम शिंदे, पांडुरंग अभंग, भानुदास मुरकुटे, आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, धीरज मुरकुटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनीही प्रतिक्रिया देताना, “प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या प्रश्नात लक्ष घालावे,” अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या विषयावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp