Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनावर येणार चित्रपट; 20 कोटींचं बजेट, नावही ठरलं..

'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनावर येणार चित्रपट; 20 कोटींचं बजेट, नावही ठरलं..

Letsupp 1 week ago

Movie On CJP Protest : NEET पेपरफुटी प्रकरण, जंतर-मंतरवरील ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) आंदोलन आणि त्यानंतर घडलेले राजकीय घटनाक्रम आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. या आंदोलनावर आधारित फीचर फिल्मची घोषणा करण्यात आली असून, चित्रपटासाठी अंदाजे 20 कोटी रुपयांचं बजेट असणार असून, 2027 मध्ये तो प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे.

आजतकने याबाबत वृत्त प्रकशित केले आहे.

चित्रपटाचं नवाही निश्चित

जयपूरचे राहणारे गोविंद देव ‘ब्रह्म’ यांनी या चित्रपटाची घोषणा केली असून, दीर्घ संशोधन आणि स्क्रिप्टवर काम केल्यानंतर याबाबत औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटासाठी ‘The Accidental Cockroach Party’ हे नाव देण्यात आले असून, हे शीर्षक अधिकृतपणे नोंदणीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

निर्मात्यांच्या दाव्यानुसार, हा चित्रपट केवळ आंदोलनाची कथा सांगणार नाही, तर त्या आंदोलनामागील नियोजन, पडद्यामागील घडामोडी आणि अनेक चर्चित घटनांवरही प्रकाश टाकणार आहे. चित्रपटाला देण्यात आलेल्या नावामुळे या चित्रपटाची चर्चा सुरू झाली असून, तो त्या काळातील राजकीय घडामोडींवर भाष्य करणारा असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

20 कोटींचं बजेट

उपलब्ध माहितीनुसार, हा चित्रपट लहान स्वरूपाचा डॉक्युमेंटरी प्रकल्प नसून मोठ्या प्रमाणावर तयार होणारा फीचर फिल्म प्रकल्प असेल. त्यासाठी 20 कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. गोविंद देव ‘ब्रह्म’ यांच्या देखरेखीखाली पटकथेचं अंतिम काम सुरू असून, चित्रिकरणासाठी विविध लोकेशन्सची पाहणी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

स्टारकास्टबाबत उत्सुकता

चित्रपटातील प्रमुख कलाकार, दिग्दर्शक आणि सहनिर्मात्यांची निवड अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील काही निर्मात्यांशी चर्चा सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. सर्व नियोजनानुसार काम झाल्यास हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट आंदोलनाच्या केवळ बाह्य घटनांवर आधारित नसून, त्यामागील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचाही वेध घेणार आहे. मात्र, चित्रपटातील कथानक आणि दावे हे निर्मात्यांच्या मांडणीवर आधारित असतील. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच त्यातील घटनांचे स्वरूप आणि तथ्य स्पष्ट होईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp