Dailyhunt
काँग्रेस, राष्ट्रवादीला विधानपरिषदेत उद्धव ठाकरेच हवेत; पण ठाकरेसेनेत वेगळीच धडपड.

काँग्रेस, राष्ट्रवादीला विधानपरिषदेत उद्धव ठाकरेच हवेत; पण ठाकरेसेनेत वेगळीच धडपड.

Letsupp 5 days ago

Legislative Council Elections: विधानपरिषदेच्या (Legislative Council Elections) नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे पाच, शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा निवडून येणार आहे.

तर महाविकास आघाडीची एक जागाच निवडून येऊ शकते आणि ती जागा ठाकरेसेनेची असणार आहे. पण उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार की दुसरं कोणी यावरून वाद सुरू झालाय. नेमकी कोण विधानपरिषदेवर जाणार हे पाहुया…

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हा ठाकरेंसाठी आग्रही आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी अद्याप विधानपरिषदेवर जाण्यासाठी होकार दिलेला नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीत वाद होऊ शकते. त्यातच आदित्य ठाकरे हे युवासेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्या नावासाठी आग्रही असल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांनी झळकविले होते. सूरज चव्हाण आदित्य ठाकरे यांचे खास आहेत. खिचडी घोटाळ्याच्या आरोपाखाली ते एक वर्ष तुरुंगात होते. त्यामुळे आदित्य ठाकरे चव्हाणाच्या नावाबाबत आग्रही होते. परंतु स्वतः आदित्य ठाकरे यांनी ही शक्यता फेटाळून माध्यमांना फटकारले आहे. काही चॅनल्स आज पुन्हा बातमी चालवत आहेत की, माझ्या मनात अमुक एक उमेदवार आहे आणि मी आग्रही आहे वगैरे… नम्रपणे पुन्हा एकदा सांगतो की, असल्या खोट्या बातम्या चालवण्याआधी असले बोगस “सोर्स” बदला! तुमच्या सोर्स च्या मनात ही निराधार बातमी आणि मी जितका आहे, तितका माझ्या मनात हा सोर्सही नाही आणि ही बातमी चालवणारेही नाहीत! पक्ष अधिकृतरित्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचं नाव जाहीर करेल, असे आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.

उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. उमेदवार दिल्यास निवडणूक होऊ शकते, अशी शक्यता आहे. उद्धव ठाकरे व्यतिरिक्त पक्षातील पाच ते सहा जणांचे नावे चर्चेत आहेत. त्यात शिवसेनेच्या प्रवक्ता सुषमा अंधारे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार, राजन विचारे, माजी आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत यांचे नावे चर्चेत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp