Dailyhunt
कोरोना काळात नियमांचे उल्लंघन, न्यायालयाने सुनावली 9 पोलीस अधिकाऱ्यांना फाशी; नेमकं प्रकरण काय?

कोरोना काळात नियमांचे उल्लंघन, न्यायालयाने सुनावली 9 पोलीस अधिकाऱ्यांना फाशी; नेमकं प्रकरण काय?

Letsupp 1 week ago

Tamil Nadu Custodial Death : तमिळनाडूतील 2020 मधील कस्टोडियल डेथ प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय देत 9 पोलीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात 58 वर्षीय पी. जयराज आणि त्यांचा 38 वर्षीय मुलगा बेनिक्स यांचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला होता.

या प्रकरणात न्यायालयाने 9 पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

पोलीसांनी लॉकडाऊनच्या (Lockdown) नियमांचे उलंघननं केल्या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले होते. यानंतर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला होता असा आरोप पोलिसांवर करण्यात आला आहे.

न्यायालयाने काय म्हटले?

या प्रकरणात न्यायालयाने मार्च 2026 मध्ये (Tamil Nadu Custodial Death) या अधिकाऱ्यांना हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. पोलिसांनी केवळ मारहाण केली नाही तर हत्येच्या उद्देशानेच हे कृत्य केले असं न्यायालयाने म्हटले आहे. तसेच या प्रकरणात आरोपींनी नि:शस्त्र लोकांवर हल्ला केल्याने त्यांचे वय आणि कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेत त्यांना कमी शिक्षा दिली जाऊ शकत नाही असं देखील न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

कोरोना काळात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करुन आपली मोबाईलची दुकान उघडी ठेवण्याचा आरोप 58 वर्षीय पी. जयराज (P. Jayaraj) आणि त्यांचा मुलगा 38 वर्षीय बेनिक्स (Beniks) यांच्यावर करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कोठडीत त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली होती.

वडिलांच्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेणार ; काँग्रेसचं पार्थ पवारांना प्रत्युत्तर

या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला असे निरीक्षण नोंदवत सोमवारी न्यायालयाने 9 पोलीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात एकूण 10 पोलिसांना अटक करण्यात आली होती मात्र 2020 मध्येच एका कोरोनामुळे एका पोलीसाचा मृत्यू झाला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp