Dailyhunt
लैंगिक आत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका; नसरापूरच्या घटनेनंतर फडणवीसांचा मोठा निर्णय

लैंगिक आत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका; नसरापूरच्या घटनेनंतर फडणवीसांचा मोठा निर्णय

Letsupp 3 days ago

Refuse parole to sex offenders; Fadnavis’ big decision after Nasrapur incident : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नसरापूर (Pune) येथील 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि तिची निर्घृण हत्येने सर्वच हादरले.

या प्रकरणी 65 वर्षांच्या विकृताला अटक करण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र संतप्त झाला आहे. त्यावर विविध स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. त्यात आता फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला आहे की, लैंगिक गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देण्यात येणार नाही.

नसरापूरच्या घटनेनंतर फडणवीसांचा मोठा निर्णय

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नसरापूरच्या घटनेनंतर फडणवीसांचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी विधी व न्याय विभागाा आदेश दिले आहेत की, लैंगिक गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका. लैंगिक शोषणातील आरोपी हे 80 ते 90 आरोपी हे पॅरोलवर असतात. त्याच वेळी अश अनेक अत्याचाराच्या घटना घडतात. त्यामुळे या गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल दिल जाऊ नये. असे आदेश स्वत: फडणवीसांनी दिले आहेत.

4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार अन् हत्या

1 मे रोजी पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका 65 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनंतर आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी नसरापूर गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp