PM Modi On Women Reservation Bill : आजपासून लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु झाली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज या चर्चेत भाग घेत या विधेयकावर राजकारण करु नका असं आवाहन विरोधकांना केले आहे.
उद्या या विधेयकावर लोकसभेत मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी या विधेयकावर राजकारण करु नका असं आवाहन केले आहे.
लोकसभेत (Lok Sabha) बोलताना पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले की, सर्वसामान्य महिलांचा आवाज या सभागृहात नवी शक्ती बनेल. देशाच्या प्रगतीत महिलांचं महत्तवपूर्ण योगदान आहे. सामूहिक शक्तीमुळे नेहमीच चांगले निकाल पाहायला मिळतात. त्यामुळे जुन्या मर्यादांमधून बाहेर पडून नारीशक्तीला संधी देण्याची ही वेळ आहे असं लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदीम्हणाले. तसेच या विधेयकावर राजकारण करु नका असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

