Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Meta India : PM मोदींचा AI मॉर्फ व्हिडिओ बनवला?  मेटा इंडियाचे प्रमुख अरुण श्रीनिवास यांच्यावर गुन्हा.

Meta India : PM मोदींचा AI मॉर्फ व्हिडिओ बनवला? मेटा इंडियाचे प्रमुख अरुण श्रीनिवास यांच्यावर गुन्हा.

Letsupp 2 weeks ago

Meta India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा AI मार्फ करुन व्हिडिओ बनवल्याचा आरोप ठेवत हैद्राबाद पोलिसांनी मेटा इंडियाचे प्रमुख अरुण श्रीनिवास (Arun Shriniwas) यांच्यासह अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

पंतप्रधान मोदी यांचे एआय वापरुन एडिट केलेले मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ नंतर काही लोकांनी एआय वापरुन एडिट केला आणि खोटी व्हिडिओचा वापर खोटी माहिती पसरवण्यासाठी केला.

196 देश अन् फिजी; सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंड राहुल कोळोखे कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण मेटाच्या मालकीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या मॉर्फ्ड व्हिडिओशी संबंधित आहे. हा व्हिडिओ दिशाभूल करणारा असू शकतो आणि तो भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा यांच्या तरतुदींचे उल्लंघन करतो. हा डीपफेक व्हिडिओ कोणी तयार केला? सोशल मीडियावर कसा पसरला, व्हिडिओ रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना पुरेशा होत्या की नाही? याचा तपास सायबर गुन्हे पोलिस करीत आहेत. ज्यांनी कथित व्हिडिओ तयार केले, शेअर केले त्यांच्या भूमिकेचीही तपासणी पोलिस करणार आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जोडीचा नवा चित्रपट 'मूर्ती'! लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, हैद्राबाद सायबर क्राईम पोलिसांनी मेटाच्या प्रतिनिधींना बोलावून, त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन एआय-संबंधित घोटाळे, बनावट जाहिराती आणि मॉर्फ केलेली सामग्री ओळखण्याच्या व काढून टाकण्याच्या प्रक्रियेबद्दल कंपनीकडून उत्तरे मागितल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली.

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींचे बनावट व्हिडिओ तयार करून ते फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या प्रमुख प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले जात होते. या व्हिडिओमुळे जनतेची दिशाभूल होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हे बनावट व्हिडिओ सर्वप्रथम कोठे आणि कोणी अपलोड केले, ते प्रसारित करण्यासाठी कोणती खाती वापरली गेली आणि ते पसरवण्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp