Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मी कामाचा माणूस, पाणी योजनेचे थकीत बिल माफ करून योजना सुरू केली; शिवाजीराव कर्डिले

मी कामाचा माणूस, पाणी योजनेचे थकीत बिल माफ करून योजना सुरू केली; शिवाजीराव कर्डिले

Letsupp 1 year ago

Shivajirao Kardile : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूक प्रचाराला आता वेग आला. राहुरी विधानसभेचे भाजप उमेवदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनीही मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरूवात केली.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना बारागाव नांदूर परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने राबवीत असताना नियमात बसत नसलेली कामे नियमात बसवून दिली आणि जनतेला लाभ मिळून दिला, असं प्रतिपादन कर्डिले यांनी केलं.

संग्राम जगतापांना भाजपकडून समर्थन, आगरकर म्हणाले विजयी भव…

मी कामाचा लोकप्रतिनिधी आहे. बारागाव नांदूर पाणी योजनेचे वीज बिल थकीत होते. ते माफ करून १७ गावांची योजना सुरू केली, असंही कर्डिले म्हणाले.

कर्डिले यांनी बारागाव नांदूर, कुरणवाडी, चिंचाळे, गड आखाडा, घोरपडवाडी, मल्हारवाडी, मोमिन आखाडा, बोरटेक परिसरात प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, विक्रम तांबे, प्रभाजी सूळ, सारंगधर पवार, ज्येष्ठ नेते कैलास पवार, युवराज गाडे, राजेंद्र गोपाळे, रखमा खिलारी, सुरेश बांदकर, नसीर शेख, भारत जाधव, अण्णासाहेब भास्कर, साहेबराव शिंदे, सयाजी श्रीराम, अशोक घाडगे, संदीप गाडे, शिवाजी सागर, रघुराम शिंदे, बाबासाहेब धोंडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

तर धनराज गाडे म्हणाले, माजी मंत्री कर्डिले यांनी कधीही विकासकामात राजकारण केले नाही. त्यांनी विरोधकांचीही कामे केली. शेतकरी मंडळ माजी मंत्री कर्डिले यांच्या पाठीमागे उभे आहे, असं गाडे म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp