Dailyhunt
'मी पार्थ अजित पवार, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..,; सुनेत्रा पवार आज दिल्लीत, काँग्रेस नेत्यांना भेटणार?

'मी पार्थ अजित पवार, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..,; सुनेत्रा पवार आज दिल्लीत, काँग्रेस नेत्यांना भेटणार?

Letsupp 2 days ago

Parth Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर आज राज्यसभेत शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्लीत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुनिल तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल हे देखील आज दिल्लीत तळ ठोकणार आहे.

अशातच बारामती पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा अखेर दिवस असल्याने उपमुख्यमंत्री पवार काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेणार का? बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

युद्ध संपलं, पण ट्रम्प यांचा दरारा सुरूच; इराणला शस्त्रे पुरवणाऱ्या देशांवर 50 % टॅरिफचा झटका

येत्या 24 तारखेला बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीकडून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरु आहेत. अशातच बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आलीयं. मोरे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, असा सूर सत्ताधाऱ्यांकडून लावण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नसून महायुतीच्या कोणत्याही नेत्याने काँग्रेसच्या नेत्यांना संपर्क केला नसल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र काँग्रेसकडून देण्यात आलं.

अल्लू अर्जूनचं वाढदिवसाच्या दिवशीच चाहत्यांना गिफ्ट; ॲटलीसोबतच्या चित्रपटाचं टायटल जाहीर

बारामती पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीत आहे. पार्थ पवार आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार असून या शपथविधीसाठी सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार आहेत. बारामती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार काँग्रेस नेत्यांची भेट घेणार का? हा सवाल उपस्थित केला जात आहे.

आर नाहीतर पार! मी मरायला तयार…, इराणच्या राष्ट्रपतीसह 1 कोटी नागरिकांची मरण्याची तयारी

दरम्यान, पार्थ पवार यांच्या शपथविधीसाठी दिल्लीत राष्ट्रवादीकडून स्वागत आणि अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत. दिल्लीतल्या अनेक चौकात पार्थ पवार यांना बॅनर लावून राष्ट्रवादी युवक आघाडीकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp