Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोठा राडा; ओबीसी आंदोलकांचा मोर्चा पोलिसांनी अडवला, पाटस टोलनाक्यावर वातावरण पेटलं!

मोठा राडा; ओबीसी आंदोलकांचा मोर्चा पोलिसांनी अडवला, पाटस टोलनाक्यावर वातावरण पेटलं!

Letsupp 5 days ago

OBC Protesters' March Towards Mumbai : पाटस टोलनाक्यावर सोमवारी ओबीसी आंदोलक (OBC Protesters) आणि पोलिसांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली.ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला 'ओबीसी एल्गार मोर्चा' मुंबईच्या दिशेने रवाना झाला असला, तरी पुणे जिल्ह्यातील पाटस टोलनाक्यावर पोलिसांनी मोर्चाचा मार्ग रोखला आहे.

मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी टोलनाक्यावर बॅरिकेडिंग केले आहे.

"सोनं खरेदी करु नका"; GDP वाढीनंतर मोदींचा देशवासीयांना सल्ला

मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती असतानाही लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे पाटस टोलनाक्यावर पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून समजूत, आंदोलक मात्र मुंबईला जाण्यावर ठाम

पाटस टोलनाक्यावर पोहोचल्यानंतर काही आंदोलकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने बॅरिकेडिंग करत मोर्चाला पुढे जाण्यापासून रोखले. पोलीस अधिकारी आंदोलक आणि मोर्चाच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

परीक्षांमध्ये गैरप्रकार थांबता थांबेना! पुणे मनपाच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत थेट चष्म्यात छुपा कॅमेरा 6 जणांवर गुन्हा

मात्र, मुंबईच्या दिशेने पुढे जाण्याच्या निर्णयावर आंदोलक ठाम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चर्चेतून तोडगा निघतो की आंदोलन आणखी तीव्र होते, याकडे लक्ष लागले आहे.

ओबीसी आरक्षण बचावासाठी एल्गार

या मोर्चाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजातील विविध संघटना आणि कार्यकर्ते एकत्र आले आहेत. मनोज जरांगे-पाटील यांच्या आरक्षणाच्या मागण्यांबाबत ओबीसी समाजाकडून व्यक्त होणाऱ्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

डॉ. रुपनवर मृत्यू प्रकरणात माजी मंत्र्यांच्या PAचं कनेक्शन? रोहित पवारांची कठोर कारवाईची मागणी

पाटस टोलनाक्यावर आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांकडे गोपीनाथ मुंडे, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेले बॅनर्स दिसून आले. घोषणाबाजी करत आंदोलकांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची मागणी केली.

पाटस टोलनाक्यावर कडक पोलीस बंदोबस्त

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पाटस टोलनाका परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांनी मुंबईकडे कूच करू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून त्यांच्याशी सातत्याने चर्चा सुरू आहे.

आजपासून खिशाला झळ! दूध, CNG, रिक्षा-टॅक्सी महाग; जाणून घ्या आजपासूनचे नवे दर

दरम्यान, आंदोलकांचा पुढील निर्णय काय असणार आणि पोलिसांच्या चर्चेनंतर मोर्चाबाबत कोणता तोडगा निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp