Dailyhunt
मोठी बातमी! बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवारांसाठी अवघड; काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा

मोठी बातमी! बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवारांसाठी अवघड; काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा

Letsupp 3 weeks ago

राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. (Baramati) बारामती पोटनिवडणुकीसाठी अखेर काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. आकाश मोरे यांना काँग्रेसनेउमेदवारी दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती.

या विधानसभेच्या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होऊद्या अशी सर्वत्र चर्चा असताना आता काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने सुनेत्रा पवारांना निवडणूक सोप्पी नाही असं बोलल जात आहे.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होता. परंतु या निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचं काँग्रेसकडून आधीच जाहीर करण्यात आलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला असून, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये आकाश मोरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

बारामतीपासून भोंदूबाबा प्रकरणापर्यंत तटकरे-जय पवार अ‍ॅक्टिव्ह; राष्ट्रवादीची आक्रमक रणनीती स्पष्ट

काँग्रेसकडून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आकाश मोरे हे काँग्रेसचे माजी आमदार विजय मोरे यांचे चिरंजीव आहेत. आकाश मोरे यांचे वडील विजय मोरे विधानपरिषदेवर आमदार होते. आकाश मोरे आणि त्यांचं कुटुंब काँग्रेसचे निष्ठावान समजले जातात. आकाश मोरे हे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील चेहरा आहे.

बारामतीमध्ये धनगर समाजाचं निर्णयाक मतदान आहे, त्यामुळे काँग्रेसने यावेळी धनगर समाजाचे असलेल्या आकाश मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे बारामतीच्या दौऱ्यावर असून, उद्याच आकाश मोरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये धनगर समाजाचं मतदान जास्त असल्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp