Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोठी बातमी, मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा नाकारली परवानगी

मोठी बातमी, मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा नाकारली परवानगी

Letsupp 1 day ago

Manoj Jarange : मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंना मोठा धक्का दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून 20 सप्टेंबरला मुंबईतील आंदोलनाला मुंबईल पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारली आहे.

मनोज जरांगे यांच्याकडून रविवारी (13 सप्टेंबर) रोजी आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आली होती मात्र मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तर आज देखील मनोज जरांगे पाटील यांना परवानगी नाकारण्यात आल्याने आता ते काय भूमिके घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मराठा आरक्षणासाठी 20 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. पाटील 20 सप्टेंबरपासून आंदोलन करण्यासाठी 15 तारखेला अंतरवली सराटी येथून निघणार आहे.

जरांगे पाटील यांच्याकडून रविवारी परवानगी नाकारल्यानंतर पुन्हा परवानगी मागण्यात आली होती मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंदोलनाला गणेशोत्सवानंतर परवानगी देण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी परवानगी देण्यात येईल असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दिशा सालियन प्रकरणात CBI ची मोठी कारवाई ; 6 वर्षांनंतर गुन्हा दाखल –

तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील एक मोठी घोषणा केली आहे. उद्या हजारो समर्थकांसह मुंबईकडे मनोज जरांगे रवाना होणार होते मात्र आता आपण मुंबईला एकटेच जाणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच त्यांनी समर्थकांनी आपल्यासोबत मुंबईला येऊ नये, असं आवाहन देखील केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सणासुदीच्या काळात आपल्या विरोधात डाव टाकल्याचा आरोप जरांगे यांनी केला. त्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी आपल्यालाही डाव टाकावा लागणार असल्याचं ते म्हणाले. आता आपण एकटेच मुंबईत येणार असल्याने सरकार आपल्याला आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देणार का, असा थेट सवालही जरांगे यांनी फडणवीस सरकारला केला होता मात्र आता देखील मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना परवानगी नाकारल्याने जरांगे काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp