Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'मुक्काम पोस्ट देवाच घर' चित्रपट 5 भारतीय भाषांमध्ये डब; मराठी चित्रपटसृष्टीचं एक अभूतपूर्व पाऊल

'मुक्काम पोस्ट देवाच घर' चित्रपट 5 भारतीय भाषांमध्ये डब; मराठी चित्रपटसृष्टीचं एक अभूतपूर्व पाऊल

Letsupp 1 year ago

Mukkam Post Devach Ghar Film Dubbed In Five Language : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ (Mukkam Post Devach Ghar) हा पाच भारतीय भाषांमध्ये डब केलेला पहिला मराठी चित्रपट (Marathi Movie) आहे.

हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये हा चित्रपट (Entertainment News) डब करण्यात आलाय.

मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभूतपूर्व पाऊल टाकत, बहुचर्चित चित्रपट ‘मुक्काम पोस्ट देवाच घर’ हा पाच भारतीय भाषांमध्ये डब करून प्रदर्शित झालेला पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये हा चित्रपट डब करण्यात आला असून मराठी चित्रपट बनला आहे. प्राईम व्हिडिओवर आपल्याला या चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे.

Video : पहलगामच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याची आत्महत्या; व्हिडिओ होतोय व्हायरल

कीमाया प्रॉडक्शन्स निर्मित आणि निर्माते महेश कुमार जायस्वाल आणि कीर्ती जायस्वाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठी भाषेत जेव्हा आम्ही हा चित्रपट प्रदर्शित केला तेव्हा आम्हाला प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम, अभिप्राय याचा विचार करून आम्ही हा चित्रपट इतर भाषांमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाची कथा ही कोणत्याही एका विशिष्ट भाषेतील लोकांची नसून आपल्या सर्वांच्या सभोवताली घडणारी अशी आहे. ही कथा देशभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत आणि घरांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे चित्रपटाचे निर्माते म्हणाले.

"देशाला जे वाटतं तसंच घडणार", PM मोदींचं नाव घेत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला रोखठोक इशारा

निरागसता, उबदारपणा आणि भावनिक खोलीने भरलेले एक मार्मिक कथानक, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाने त्याच्या मूळ मराठी स्वरूपात आधीच जिंकले आहे. आकर्षक कथा, आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने जागतिक स्तरावर रिलीजची योजना सुरू असल्याची देखील टीमने आता केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp