Dailyhunt
मुसळधार पावसाने पुणे जलमय; जंगली महाराज रोड, स्वारगेट, वारजे भागात पाणी साचलं, वाहनचालक त्रस्त

मुसळधार पावसाने पुणे जलमय; जंगली महाराज रोड, स्वारगेट, वारजे भागात पाणी साचलं, वाहनचालक त्रस्त

Letsupp 2 weeks ago

Pune flooded due to heavy rain : पुणे शहरात आज दुपारपासून अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, अनेक भागांत जोरदार सरी कोसळत आहेत. रस्त्यानावर अक्षरशः पाणी वाहताना दिसत असून, काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

जंगली महाराज रोड, स्वारगेट, वारजे यांसारख्या भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने चित्र पाहायला मिळत आहे.

या अवकाळी पावसामुळे पुण्यात भर दुपारीच अंधाराचे वातावरण निर्माण झाले आहे. दृश्यमानता कमी झाल्याने अनेक वाहनचालकांना हेडलाईट सुरू करावे लागले. उन्हाळ्याचा काळ असल्याने बहुतांश नागरिकांकडे छत्री किंवा रेनकोट नसल्याने अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हा पाऊस केवळ शहरापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागात देखील त्याचा प्रभाव दिसून येत आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास एक तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस सुरू होता.

Raghav Chadha : एअरलाईन्सची लूट ते ट्रॅफिक जाम; चड्ढांच्या प्रश्नांनी सरकार हादरलं अन् आता पद गेलं

दरम्यान, हवामान अभ्यासक के. एस. होसाळीकर यांनी या परिस्थितीबाबत माहिती देताना सांगितले की, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट अशी स्थिती पाहायला मिळत आहे. राज्याच्या आतील भागात निर्माण झालेल्या विंड डिस्कांट्युनिटीमुळे हा पाऊस होत असून, पुढील दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

तसेच, विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात काम करणाऱ्यांनी मोकळ्या मैदानात किंवा झाडाखाली थांबू नये, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp