Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नीट घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी; इंजिनिअरिंग-फार्मसी प्रवेशांना मोठा विलंब

नीट घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी; इंजिनिअरिंग-फार्मसी प्रवेशांना मोठा विलंब

Letsupp 4 days ago

The future of millions of students is uncertain : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट युजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचे पडसाद आता राज्यातील उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेवर उमटू लागले आहेत.

राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली आणि तब्बल 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिलेली नीट युजी 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील इंजिनिअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मोठे संकट उभे ठाकले आहे.

राज्यातील काही इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांसह बी. फार्मसीच्या 15 टक्के ऑल इंडिया कोट्यातील प्रवाशांसाठी नीटच्या गुणांचा आधार घेतला जातो. त्यामुळे नीटचा अंतिम निकाल जाहीर झाल्याशिवाय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलला पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू करता येणार नाही. परिणामी, संपूर्ण प्रवेश वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, आता 21 जून रोजी नीटची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर होण्यासाठी आणखी 20 ते 25 दिवस लागू शकतात. म्हणजेच जुलैच्या मध्यापर्यंत किंवा अखेरीपर्यंत विद्यार्थ्यांना अंतिम निकालाची प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे नेहमी जून-जुलैमध्ये सुरू होणारी इंजिनिअरिंग आणि फार्मसीची प्रवेश प्रक्रिया यंदा उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.

मेडिकल प्रवेशासाठी लाखोंचे डीलिंग? शंभर टक्के सिलेक्शनची गॅरंटी देणाऱ्या मोटेगावकरच्या रॅकेटचा पर्दाफाश

प्रवेश प्रक्रियेला होणारा हा विलंब थेट नवीन शैक्षणिक सत्रावर परिणाम करणारा ठरणार आहे. कॉलेज सुरू होण्यास उशीर झाल्यास प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे हे महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान असेल. परीक्षांमधील सततच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणातील तपस अधिक गतीने सुरू असून सीबीआयने पुण्यातून आणखी एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेले बालरोगतज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरूर हे मूळचे लातूरचे आहेत. स्वतःच्या मुलासाठी त्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा आरोप आहे. सीबीआयने त्यांना चौकशीसाठी अतूरहून पुण्यात आणले होते. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील तपास आणखी विस्तारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp