Dailyhunt
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! कर्जत-जामखेडमध्ये पिक विमा वाटप सुरु.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! कर्जत-जामखेडमध्ये पिक विमा वाटप सुरु.

Letsupp 2 weeks ago

Relief for affected farmers Crop insurance distribution begins in Karjat-Jamkhed : विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून कर्जत- जामखेड तालुक्यातील २०२५ खरीप हंगामाच्या पीक विमा दाव्यांच्या प्रत्यक्ष वाटपास आजपासून सुरुवात झाली आहे.

सर्गिक आपत्ती व अनियमित पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विमा रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून गतीने सुरु झाली आहे .

2024 च्या तुलनेत बारामतीत मतदानाची टक्केवारी घटली! सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतं मिळणार?

जामखेड तालुक्यात खरीप २०२५ हंगामात उडीद व सोयाबीन या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानुसार ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून उडीद पिकासाठी सुमारे ६ कोटी ५ लाख ८७ हजार रुपये, तर सोयाबीन पिकासाठी सुमारे ११ कोटी ६५ लाख ७४ हजार रुपये असा एकूण १७ कोटी ७१ लाख ६१ हजार ७३६ रुपयांचा (सुमारे १७.७१ कोटी) पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. हा पीकविमा शेतकऱ्यांना आज दिवसभरात वितरित केला असून उर्वरित शेतकऱ्यांनाही गतिमान पद्धतीने पीकविमा वितरीत होणार आहे.

इराणमध्ये असलेल्या भारतीयांनो तात्काळ देश सोडा! ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतीय दुतावास अलर्ट मोडवर

कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठीही खरीप हंगाम २०२५ मधील मूग पिकाच्या नुकसानीपोटी सुमारे ८९ हजार ३९८ रुपयांचा विमा आज मंजूर झाला असून उर्वरित शेतकऱ्यांच्या विमा रकमेच्या वितरणालाही आजपासून सुरुवात झाली आहे.विमा कंपनी व प्रशासनाकडून पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवली जात असून कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.

हिंदू लडकीयों को मुस्लिम… म्हणत सहकारी तरूणींना अश्लील मॅसेजेस; नाशिकनंतर मुंबईतील धक्कादायक घटना

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कर्जत जामखेड मधील शेतकऱ्यांनी राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री ना. श्री.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रा पवार, विधान परिषद सभापती ना. प्रा. राम शिंदे,कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp