Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'पाच फुटाच्या बच्चन'मध्ये तगड्या कलाकारांची फौज; कीर्तन विश्व उलगडणारा टीजर प्रदर्शित

'पाच फुटाच्या बच्चन'मध्ये तगड्या कलाकारांची फौज; कीर्तन विश्व उलगडणारा टीजर प्रदर्शित

Letsupp 1 week ago

‘Paach Futacha Bachchan’ features a stellar cast teaser unveiling world of Kirtan released : आपल्या अनोख्या नावाने चर्चेत असलेल्या, एका कीर्तनकार तरुणीची गोष्ट सांगणाऱ्या 'पाच फुटाचा बच्चन' या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

उत्तम कलाकारांचा समावेश असलेला हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

"सोनं खरेदी करु नका"; GDP वाढीनंतर मोदींचा देशवासीयांना सल्ला

‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटात तरूण कीर्तनकार मुलीची गोष्ट आहे. तिच्या कीर्तनात कोल्हापुरी भाषा आहे. संतांचे अभंग तिला मुखोद्गत आहेत. जनमानसात तिचं प्रचंड नाव आहे. उंचीने पाच फूट असलेल्या या तडफदार मुलीला ‘पाच फुटाचा बच्चन’ म्हणून ओळखलं जातं. या प्रमुख भूमिकेतून श्रुती मधुदीप ही अभिनेत्री पदार्पण करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टिजरने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. यात तगड्या कलाकारांची फौज आहे. त्यांचे नवे लुक बघून, पात्रांची झलक बघून उत्सुकता तयार होते आहे. मराठी मनाला भावणाऱ्या कीर्तन या विषयाला हा सिनेमा साद घालतो आहे, असं दिसतं आहे. अवघ्या दीड मिनिटाचा हा टीजर अत्यंत नाट्यमय असून त्यातील दृश्यांनी प्रेक्षकांची मने खिळवून ठेवली आहेत. या चित्रपटात नेमकं काय घडणार आहे, याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे.

एका निरागस इच्छेपासून सुरू होणारी हलकीफुलकी गोष्ट! 'आली मोठी शहाणी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मूळ प्रायोगिक एकपात्री नाटकातून मांडण्यात आलेल्या या गोष्टीला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. मराठी मनाची नस पकडेल अशा या नाटकाचे चित्रपटात रूपांतर झाले आहे. नाटकातून चित्रपटात रूपांतर होण्याच्या या दैदीप्यमान यादीत या चित्रपटाचे नाव जोडले गेल्याने या चित्रपटाविषयीचं कुतूहल वाढलं आहे. या नाट्यमय कलाकृतीत नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी ९ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

परीक्षांमध्ये गैरप्रकार थांबता थांबेना! पुणे मनपाच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत थेट चष्म्यात छुपा कॅमेरा 6 जणांवर गुन्हा

कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज यांनी 'पाच फुटाचा बच्चन' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात श्रुती मधुदीप, गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमीत, क्षितीश दाते, पुष्कराज चिरपुटकर, आशय कुलकर्णी, ओमप्रकाश शिंदे, विनोद वणवे यांच्या भूमिका आहेत. अभिषेक शेटे यांनी छायांकन, सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलन, निरंजन पेडगावकर यांनी संगीत, तर प्रदीप आवटे यांनी गीतलेखन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp