Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune Crime : पुण्यातील बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; तीन डॉक्टर 6 महिन्यांसाठी निलंबित, धक्कादायक प्रकरण.

Pune Crime : पुण्यातील बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; तीन डॉक्टर 6 महिन्यांसाठी निलंबित, धक्कादायक प्रकरण.

Letsupp 1 year ago

Ragging At B J Medical College in Pune : पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग (Ragging At B J Medical College) होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन डॉक्टरांवर कारवाई केली असल्याची देखील माहिती मिळतेय.

iframe{min-width: 0px !important;box-sizing: border-box;}

बी. जे. मेडिकल कॉलेजमधील तीन डॉक्टरांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलाय. त्यांना महाविद्यालय (Pune News) अन् वसतिगृहात प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शैक्षणिक आणि परिषदांमध्ये देखील या डॉक्टरांच्या सहभागावर बंदी घालण्यात आली असून एक लाख रूपयाचा दंड ठोठावण्यात (Crime News) आलाय.

याप्रकरणी 28 एप्रिल रोजी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर समितीने चार दिवस चौकशी केल्यानंतर ही कारवाई (doctors suspended) केली आहे. तर डॉ. अथर्व घोरपडे, डॉ. गौरव तिवारी आणि डॉ. राहुल जाधव यांनी रॅगिंग (B J Medical College) केल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.

नेमकं काय प्रकरण?

एप्रिल महिन्यात एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संस्थापक असलेल्या व्यक्तीच्या नातवावर रॅगिंग झाल्याचा प्रकार घडला. ही घटना पुण्यातील बी.जे. मेडिकल वैद्यकीय महाविद्यालयात घडली होती. तर पिडीत विद्यार्थी बी.जे. मेडिकल वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमएस होण्यासाठी आला असून तो आर्थोपेडीक अभ्यासक्रमाचा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे.

Pune Accident : पुण्यात मद्यधुंद चालकाने 12 विद्यार्थ्यांना उडविल्याचे प्रकरण, पोलिसांनी ठोकल्या कार मालकाला बेड्या

याच विभागात दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी रॅगिंग केली, असा आरोप या विद्यार्थ्याने केलाय. तर यासंदर्भात तक्रार देऊन सुद्धा त्याची पुरेशी दखल घेतली नाही, असा देखील आरोप या विद्यार्थ्याने केलाय. तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अॅंटी रॅगिंग कमिटी स्थापन करण्यात आली होती. या कमिटीत 15 ते 20 जण होते. तर याप्रकरणी तिन विद्यार्थ्यांना निलंबित केली असल्याची माहिती मिळतेय.

सिनिअर्स सतत त्रास द्यायचे

मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या वर्षामध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्याला त्याचे दोन सिनिअर्स सतत त्रास द्यायचे. कधी त्याच्या डोक्यावर गार पाणी ओतून घ्यायला लावायचे, तर कधी गरम पाणी ओतून घ्यायला लावायचे. पीडित विद्यार्थ्याने अगोदर ही गोष्ट आर्थोपीडीक डीपार्टमेंटचे विभागप्रमुख डॉक्टर गीरीष बारटक्के यांना सांगितली होती. परंतु त्यांनीही पुरेशी दखल घेतली नसल्याच्या आरोप या विद्यार्थ्याने केली.

शिंदे सरकारच्या काळातील निर्णयांना कात्री; 'या' प्रोजेक्टचं टेंडर फडणवीस सरकारकडून रद्द

त्यानंतर ससून रूग्णालयाचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांना देखील हा प्रकार सांगण्यात आला. परंतु त्यांनी देखील पुरेशी दखल घेतली नाही. त्यामुळे थेट मुंबईला वैद्यकिय शिक्षण विभागाकडे दाद मागण्यात आली. त्यानंतर चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात आली. रॅगिंग करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना थेट सहा महिन्यांसाठी म्हणजेच अभ्यासक्रमाच्या एका टर्मसाठी निलंबीत करण्यात आलंय.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp