Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे कॉंग्रेसला नवे कारभारी मिळाले! प्रशांत जगताप यांची शहराध्यक्षपदी निवड.

पुणे कॉंग्रेसला नवे कारभारी मिळाले! प्रशांत जगताप यांची शहराध्यक्षपदी निवड.

Letsupp 2 months ago

Pune Congress : आगामी निवडणुकांचा दृष्टीकोन समोर ठेऊन काँग्रेसने संघटन मजबूत करण्यासाठी आता सुरुवात केलीयं. काँग्रेसने राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शहराध्यक्षपदावर कार्यकर्त्यांची निवड केलीयं.

पुण्यात नगरसेवक प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांची पुणे पूर्व कॉंग्रेसच्या शहराध्यपदी निवड करण्यात आलीयं. तर पुणे पश्चिम शहराध्यक्षपदी दिप्ती चौधरी यांची निवड करण्यात आलीयं. काँग्रेसचे सेक्रेटरी के.सी वेणुगोपाल यांनी पत्रक काढून राज्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडीची माहिती दिलीयं.

देशात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पार पडल्यानंतर आता पुढील काळात कोणत्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेसकडून राज्यभरात पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलीयं. मागील अनेक दिवसांपासून धुमसणारी गटबाजी आणि शहराध्यक्षपदाचा प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या पावलावर पाऊल ठेवलंय. पुण्यात दोन शहराध्यक्षांची निवड करुन काँग्रेसने गटबाजीला फुलस्टॉपच देऊन टाकलायं.

हिंदू-मुस्लिम राजकारणानेच निवडणुका जिंकत नाहीत…, भाजपच्या विजयावर प्रदीप गुप्ता यांचे विश्लेषण

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याबाबत चर्चांना सुरुवात झाली होती. निवडणूक काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते याबाबत बैठका घेत असून, काका-पुतणे एकत्रितपणे निवडणुका लढवू शकतात, असा कयास बांधला जात होता. मुंबईत ठाकरे बंधूंनी अधिकृतपणे युती घोषित केल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यालाही बळ मिळालं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणुका लढवू शकतात, असे संकेत मिळताच प्रशांत जगताप यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी जगताप चांगलेच चर्चेत आले होते.

पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला म्हणावं तसं यश मिळाले नाही. परंतू अनेक प्रभागांत काँग्रेसचे निवडून गेले आहेत. त्यात प्रशांत जगताप यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजयही मिळवला. त्यानंतर पुणे काँग्रेसमध्ये प्रशांत जगताप यांचं महत्व अधिक वाढत गेलं. आता जगताप यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर ते पुण्यात काँग्रेसच्या संघटनासाठी कोणती रणनीती वापरणार? याकडं लक्ष लागलंय.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp