Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रुपाली चाकणकरांची भूमिका करू नका; दीपाली सय्यद यांना धमक्यांचे फोन, राजकीय दबावाचा गंभीर आरोप

रुपाली चाकणकरांची भूमिका करू नका; दीपाली सय्यद यांना धमक्यांचे फोन, राजकीय दबावाचा गंभीर आरोप

Letsupp 3 months ago

Threatening calls to Deepali Sayyed : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे राज्यभर गाजलेल्या या प्रकरणावर आता महाराष्ट्र एप्सटिन फाईल्स नावाचा चित्रपट येत असून, त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याचे संकेत दिले जात आहेत.

विशेष म्हणजे अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या चित्रपटात माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारण्याची शकयता आहे. मात्र हा रोल करू नका, असा दबाव आपल्यावर आणला जात असल्याचा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी केला आहे.

दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांच्या महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स या चित्रपटात अशोक खरातच्या कथित गैरप्रकारांवर भाष्य करण्यात येणार आहे. आता सगळं उघड होणार…! ही चित्रपटाची टॅगलाईन सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या चित्रपटात रुपाली चाकणकरांची भूमिका करण्याबाबत आपल्याशी चर्चा झाली असल्याचं दीपाली सय्यद यांनी सांगितलं.

एबीपी माझाशी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या की, मला २६ मे रोजी स्क्रिप्ट मिळाली आहे. मी सध्या ती वाचते आहे. मला रुपाली चाकणकरांची भूमिका करण्याबाबत विचारणा झाली आहे. मी चार महिने बिग बॉसच्या घरात होते, त्यामुळे अशोक खरात प्रकरणाबाबत बाहेर आल्यानंतरच माहिती मिळली. या प्रकरणात अनेक मोठी नावं असल्याचं देखील समजलं.

अहमदाबादमध्ये आढळला इबोलाचा संशयित रुग्ण; मुंबई, दमण, सिल्व्हासा प्रवासाने वाढवली धास्ती

त्या पुढे म्हणाल्या, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक धूसर रेष असते. लोकांना सत्य कळालं पाहिजे. स्क्रिप्ट वाचताना अनेक गोष्टी लक्षात येत आहेत. जर मी या भूमिकेला होकार दिला, तर पुढच्या महिन्यापासून शूटिंग सुरू होईल. ऑक्टोबरमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. अशोक खरातला गुरु मानून अनेकांनी त्याची पाद्यपूजा केल्याचे फोटो यापूर्वी व्हायरल झाले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर देखील टीका झाली होती. याबाबत बोलताना दीपाली सय्यद यांनी गुरु म्हणजे दिशा दाखवणारी व्यक्ती. आई-वडील आणि शिक्षक हे खरे गुरु असतात. अधिक खरात कसला गुरु होता हे मला माहित नाही. मी ऐकलंय की तो नंबर काढायचा, पाणी प्यायला द्यायचा. अशा प्रकारे वागणारा माणूस गुरु कसा असू शकतो? असा सवाल उपस्थित केला.

दरम्यान, सर्वात मोठा दावा करताना दीपाली सय्यद यांनी सांगितलं की, मला काही महिला नेत्यांचे फोन आले. रुपाली चाकणकरांची भूमिका करू नका, थोडं थांबा, तुमचं राजकीय करिअर उद्धवस्त होईल, अशा शब्दांत मला इशारे देण्यात आले. माझ्यावर राजकीय दबाव आणला जातो आहे. मात्र मी कोणत्याही दबावाला घाबरणार नाही. त्यांनी स्पष्ट केलं की, हा फोन स्वतः रुपाली चाकणकर यांनी केलेला नाही. पण काही महिला नेत्यांनी संपर्क साधला. मी त्यांची नावं सांगणार नाही. मात्र हा विषय मी एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार आहे.

दीपाली सय्यद यांनी शेवटी ठाम भूमिका घेत सांगितले, मी कलाकार आहे. मला भूमिका आवडली तर मी नक्की करेन. कुणाची परवानगी घेऊन काम करत नाही. स्क्रिप्ट पूर्ण वाचल्यानांतर अंतिम निर्णय घेईन, पण दबावाला झुकणार नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp