Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Sanjay Raut : 'हा' आमदार फुटणार, शिंदे गटाकडून 20 कोटींची ऑफर; संजय राऊतांनी नावही सांगितलं

Sanjay Raut : 'हा' आमदार फुटणार, शिंदे गटाकडून 20 कोटींची ऑफर; संजय राऊतांनी नावही सांगितलं

Letsupp 5 days ago

Sanjay Raut : ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाचे 14 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून लवकरच पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा राज्यातील राजकारणात जोराने सूरू आहे.

तर दुसरीकडे आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा करत महाविकास आघाडीचा आणखी एक आमदार फुटणार असल्याचं म्हटलं आहे. पत्रकार परिषेदत बोलताना त्यांनी एका आमदाराला शिंदे गटाकडून 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली असल्याचा दावा केला आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, माझ्या कानावर आले आहे की, लिंगाडे नावाचे आमदार आहेत त्यांना 20 कोटी रुपायंची ऑफर आली आहे. काल परवाची गोष्ट आहे. धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) हे काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार असून त्यांना शिंदे गटाकडून 20 कोटी रुपयांची ऑफर आणि आगामी निवडणुकीत आमदारकी देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

एकनाथ शिंदे पापाचा पैसा पचणार नाही – संजय राऊत

तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे तुम्हाला आणि फुटीर खासदारांना राम मंदिर चोरीचा पैसा पचणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर मुघल काळात मेहमूद गजनवी होता. आताच्या या चोरीचा प्रकरणात 25 मेहमूद गजनवी आहेत. त्यात तुम्ही सांगत आहात ते कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी देखील असू शकतात असेही राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीला आराम पडो. तुमच्या हातात अफाट सत्ता, यंत्रणा आणि राम मंदिरातील लुटलेला पैसा आहे. हा राम मंदिरातून लुटलैला पैसा आहे. हा पापाचा पैसा पचणार नाही. जे सहा फुटीर खासदार असतील त्यांना हा पैसा तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना पचणार नाही असं खासदार संजय राऊत म्हणाले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महागाईत दिलासा; पाचव्यांदा वाढले दर; प्रति क्विंटल भाव काय?

तसेच सगळ्यांना जावं लागलं, मोदी अमर आहेत का?, अमित शाह अमर आहेत का? फडणवीस- शिंदे अजराअमर आहेत का ? असा सवाल देखील माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp