Dailyhunt
शक्तिवर्धक पेयाचा शॉर्टकट महागात! पोलीस भरतीत तरूणाचा मैदानावर गोंधळ, नेमकं काय घडलं?

शक्तिवर्धक पेयाचा शॉर्टकट महागात! पोलीस भरतीत तरूणाचा मैदानावर गोंधळ, नेमकं काय घडलं?

Letsupp 1 week ago

Energy drink becomes expensive A young man’s confusion on Graound in police recruitment : पोलीस भरतीमध्ये यशस्वी होऊन पोलीस दलामध्ये दाखल होण्याचं स्वप्न घेऊन मैदानावर उतरत असतात.

त्यात ते अनेक प्रकरे अभ्यास, क्लासेस, मैदान चाचणीसाठी घेतली जाणारी मेहनत या अशा एक ना अनेक प्रकरचे कष्ट हे तरूण घेत असतात. पण कष्टाला शॉर्टकर्ट नाही हे देखील तेवढचं खरं अशीच घटना पुणे येथील पोलीस भरती प्रक्रियेसाठी दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर

नेमकी घटना काय?

पुणे येथील पोलीस भरती प्रक्रियेसाठी दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर चाचणी सुरू होती. त्यामध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी एक उमेदवारीने एक शक्तिवर्धक पेय प्यायलं. त्याचा सुरूवातीला विपरीत परिणाम झाला नाही मात्र त्यानंतर हा तरूण जेव्हा चाचणी पुर्ण करून मैदानातून बाहेर पडला तेव्हा मात्र त्याच्या शरीर आणि मेंदूवर परिणाम झाला. त्याची मानसिक स्थिती बिघडली.

पुतळ्यांच्या माध्यमातून मराठा समाजाविरोधात इतर समाजांना भडकावण्याचा डाव, मनोज जरांगेंचा आरोप

हा तरूण विचित्र वागू लागला मैदानावर गोंधळ घालू लागला. त्यामुळे इतर उमेदवार आणि अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये भातीचे वातावरण निर्माण झाले. एसआरपीएफच्या जवानांनी त्याला तात्काळ नियंत्रणात आणून रूग्णालयात दाखल केले. आता या तरूणाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र या तरूणामुळे भरतीच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ झाला.

मृत्युच्या दारातही अमेरिकन पायलट एकटा नाही; इराणच्या डोंगरदऱ्यात सुरूये हायटेक 'सर्व्हायव्हल गेम'

या घटनेनंतर पोलीस भरती शॉर्टकटचा वापर करणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय आला. एक तर या तरूणाचे पोलीस दलामध्ये दाखल होण्याचे स्वप्न भंगले. त्याच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम झाला. त्याच्या जीवाला धोका देखील निर्माण झाला होता. मात्र एसआरपीएफच्या जवानांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp