Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Spider-Man: Brand New Day : हॉलिवूड चित्रपटाची भारतात तीन दिवसांत सर्वाधिक कमाई; दोनशे कोटींचा टप्पा ओलांडला

Spider-Man: Brand New Day : हॉलिवूड चित्रपटाची भारतात तीन दिवसांत सर्वाधिक कमाई; दोनशे कोटींचा टप्पा ओलांडला

Letsupp 1 week ago

Spider-Man: Brand New Day Box Office: स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे (Spider-Man: Brand New Day Box Office) या हॉलिवूड चित्रपटाने भारतीयांना भुरळ घातलीय. केवळ तीन दिवसांतच इतिहास रचत 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरलाय.

सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 216 कोटी रुपयांची कमाई करत भारतीय बॉक्स ऑफिसवरक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. तसेच हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हॉलिवूड ब्लॉकबस्टर्सपैकी एक ठरला आहे.

भारतीय प्रेक्षकांचा लाडका सुपरहिरो स्पायडर-मॅनने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी चित्रपटाने विक्रमी 73 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर शुक्रवारी 58.4 कोटी रुपये, तर शनिवारी तब्बल 85 कोटी रुपये कमावत शुक्रवारीच्या तुलनेत 46 टक्क्यांची वाढ नोंदवली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे आणि जोरदार तोंडी प्रसिद्धीमुळे ही मोठी झेप मिळाली.


अवघ्या तीन दिवसांत स्पायडर मॅन चित्रपटाचा विक्रम

भारतातील 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा हॉलीवूड चित्रपट
भारतात प्रदर्शित झालेल्या कोणत्याही हॉलीवूड चित्रपटासाठी सर्वात मोठी ओपनिंग डे कमाई
5,000 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शन, भारतातील कोणत्याही चित्रपटासाठी सर्वात व्यापक रिलीज
भारताच्या इतिहासातील कोणत्याही चित्रपटासाठी सर्वाधिक शो प्रदर्शित

जागतिक स्तरावरही स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डेने दमदार सुरुवात केली आहे. उत्तर अमेरिकेत चित्रपटाने 168 दशलक्ष डॉलरची कमाई करत त्या देशातील देशांतर्गत प्रदर्शनासाठी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ओपनिंगपैकी एक नोंदवली आहे. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून सर्व भाषांतील प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे स्पायडर-मॅनची भारतातील लोकप्रियता पुन्हा अधोरेखित झालीय. 2026 मधील सर्वात मोठा चित्रपटगृहातील अनुभव म्हणून या चित्रपटाची ओळख निर्माण झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp