Shivajirao Kardile News : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु आहे. तर उमेदवारांकडून जोरदार प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशातच अहिल्यानगरमधील राहरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या गटाला भगदाड पडलंय.
राहुरी तालुक्यातील सडे गावातील युवकांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलायं. त्यामुळे आता राहुरी विधानसभा मतदारसंघात कर्डिलेंची ताकद वाढल्याचं दिसून येत आहे.
अभिनंदन माझ्या मित्रा; ट्रम्प यांच्या विजयानंतर PM मोदींची खास पोस्ट; पुढचा अजेंडाही सांगितला
युवकांच्या प्रवेशादरम्यान, बोलताना कर्डिले म्हणाले, मागील महिन्यापासून भाजपात अनेक युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे. यंदाची विधानसभा निवडणूक युवकांनी हाती घेतली असल्याचं शिवाजीराव कर्डिले यांनी स्पष्ट केलंय. युवकांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्याची हमी दिलीयं.

