Dailyhunt
तीन वेळा बदलला जबाब; भिगवण प्रकरणात तरुणीकडून जहीर शेखविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल

तीन वेळा बदलला जबाब; भिगवण प्रकरणात तरुणीकडून जहीर शेखविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल

Letsupp 1 week ago

A case of kidnapping has been filed against Zaheer Sheikh : भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा एकदा नाट्यमय वळण आलं आहे. 21 वर्षीय तरुणीने आता जहीर शेख या तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाने नव्याने खळबळ उडाली आहे.

तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 17 फेब्रुवारी रोजी ती आई आणि भावासोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेली असताना तिचं अपहरणकरण्यात आलं. या घटनेत तिने जहीर शेखचं नाव स्पष्टपणे घेतलं आहे. मात्र, याच प्रकरणात याआधी वेगळंच चित्र समोर आलं होतं. तरुणीने न्यायालयात दिलेल्या जबाबात जहीर शेखसोबत प्रेमसंबंधअसल्याचं सांगितलं होतं.

तसंच, स्वतःच्या इच्छेने त्याच्यासोबत गेल्याचंही नमूद केलं होतं. इतकंच नाही, तर आई आणि भावाने दाखल केलेली फिर्याद खोटी असल्याचं सांगत तिने शपथपत्रही सादर केलं होतं. दरम्यान, भिगवणहून निघाल्यानंतर दोघांनी श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड असा प्रवास करत महाबळेश्वर गाठलं. त्यानंतर मध्यरात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात ते दोघे हजर झाले होते. या प्रकरणाची सुरुवात मात्र अत्यंत धक्कादायक होती. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे तरुणीचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तिला जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता.

खरात प्रकरणाचं बीड कनेक्शन उघड; चाकणकर यांचं नाव घेत लिंगनिदानाबाबत मोठा दावा

पुढे न्यायालयात तरुणीने स्वतःच्या इच्छेने गेल्याचं सांगत प्रकरणाला वेगळं वळण दिलं. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव तिला सुधारगृहात ठेवण्यात आलं. मात्र, काही दिवसांनी पुन्हा मोठा ट्विस्ट आला. तरुणीने आपली भूमिका बदलत आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत तिने आई आणि मामासोबत जाण्याची तयारी दर्शवली. आता नव्याने दाखल झालेल्या तक्रारीनंतर जहीर शेखवर अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखी कोणते खुलासे होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp