US Midterm Election History : अमेरिकेचा सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष… ज्याच्या एका सहीने जगभरात खळबळ उडू शकते… पण, अमेरिकेत एक असा अदृश्य 'शाप' आहे, ज्याने मोठ्या-मोठ्या राष्ट्राध्यक्षांना गुडघ्यावर आणून सोडले आहे.
मग ते ट्रम्प असो, ओबामा असो वा बिल क्लिंटन… अमेरिकेच्या इतिहासात असा कोणता ‘मिडटर्म कर्स’ आहे, ज्याने सत्तेत असणाऱ्यांचा अहंकार क्षणात धुळीला मिळवला? आणि या निवडणुकीत हरल्यानंतर त्या राष्ट्राध्यक्षांचे हाल नेमके काय झाले? जाणून घेऊया सविस्तर…
‘मिडटर्म कर्स’ म्हणजे काय?
अमेरिकेत दर चार वर्षांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होते, पण बरोबर दोन वर्षांनंतर म्हणजेच राष्ट्राध्यक्षांच्या पहिल्या टर्मच्या मधोमध ‘मिडटर्म निवडणुका’ होतात आणि अमेरिकन राजकारणात याला ‘मिडटर्म कर्स’ किंवा मध्यावधिचा अभिशाप असे संबोधले जाते. येथे नियम असा आहे की, अमेरिकेची जनता पहिल्या दोन वर्षांत राष्ट्राध्यक्षांच्या कामाचा हिशोब मागते आणि इथेच बहुतांश वेळा, सत्तेत असणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या पक्षाला दारूण पराभवाचा सामना करावा लागतो.
अमेरिकेतील मध्यांनं निवडणुकांनी कुणा-कुणाला गुडघ्यावर बसवले?
सुरुवात करूया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून. आपल्या पहिल्या टर्ममध्ये म्हणजेच 2018 च्या मिडटर्म निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये 41 जागांचा मोठा फटका बसला होता आणि नुकताच म्हणजे 2026 च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या मिडटर्म निवडणुकीतही ट्रम्प यांच्या पार्टीला पुन्हा ऐतिहासिक पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मध्यवधि निवडणुका पराभूत होणारे ट्रम्प एकटेच आहेत का? तर, या पराभवाच्या पंगतीत बराक ओबामा ज्यांना 2010 च्या मिडटर्म निवडणुकीत एक मोठा धक्का बसला होता. डेमोक्रेट्सनी एकाच झटक्यात 63 जागा गमावल्या होत्या. यानंतर विरोधकांनी ओबामांचे कायदे पास करणे अत्यंत कठीण करून सोडले होते. त्याआधी म्हणजे 1994 च्या मिडटर्ममध्ये क्लिंटन यांच्या पक्षाला असा जबरदस्त तडाखा बसला की, अनेक दशकांनंतर रिपब्लिकन पार्टीने दोन्ही सदनांवर कब्जा केला. क्लिंटन राजकीयदृष्ट्या अतिशय कमजोर मानले जाऊ लागले होते. 2006 च्या मिडटर्म निवडणुकीत इराक युद्धाविरोधातील जनतेचा रोष बुश यांच्यावर फसला. डेमोक्रॅट्सनी दोन्ही सदने जिंकली आणि बुश यांचा उरलेला कार्यकाल प्रचंड दबावाखाली गेला.
आता प्रश्न पडतो की, या निवडणुका हरल्यानंतर राष्ट्राध्यक्षांचे हाल काय होतात? तर, अमेरिकन राजकारणात या स्थितीला ‘लेमडक’ असे संबोधले जाते. जेव्हा विरोधक संसदेवर ताबा मिळवतात, तेव्हा राष्ट्राध्यक्ष पूर्णपणे हतबल होतात. ते स्वतःच्या मर्जीने कोणताही कायदा पास करू शकत नाहीत, आर्थिक नाड्या आवळल्या जातात म्हणजेच काय तर, जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष म्हणून बिरूदावली मिळवणारा नेत्याच्या हातातली खरी राजकीय ताकदीची ढाल जणू हिरावून घेतली जाते अशी स्थी होते. त्यामुळे अमेरिकेची जनता कितीही शक्तिशाली व्यक्तीला सिंहासनावर बसवो, पण ‘मिडटर्म’च्या माध्यमातून ती आपली ताकदीची जाणीव करून द्यायलादेखील कधीच विसरत नाही हे मात्र नक्की.

