Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विधान परिषदेचे बिगुल! आमदार संग्राम जगतापांचे बंधू सचिन जगताप इच्छुकांच्या यादीत.

विधान परिषदेचे बिगुल! आमदार संग्राम जगतापांचे बंधू सचिन जगताप इच्छुकांच्या यादीत.

Letsupp 1 month ago

Maharashtra legislative councils : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था (Maharashtra legislative councils) मतदारसंघ निवडणुकीचे बिगुल वाजले असून अर्ज वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपकडून सत्यजीत कदम हे इच्छुक असून त्यांच्या पाठोपाठ असता आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन अरुण जगताप (Sachin Jagtap) आणि गणेश भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज घेऊन रवाना झाले आहेत.

काँग्रेस पक्षाकडून श्रीरामपूर येथील करण जयंत ससाणे यांनीही अर्ज नेला आहे.

राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार?…,मुख्यमंत्री फडणवीस अन् अमित शाहांची बंद दाराआड खलबत

राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. अहिल्यानगर विधान परिषदेच्या जागेवर भाजपचाच हक्क आहे. कारण सर्वाधिक मतदार भाजपकडे आहेत. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ स्तरावर चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह कोअर कमिटीची बैठक होऊन जागावाटपाचे सूत्र ठरणार आहे.

दरम्यान राहुरी पोट निवडणुकीत अक्षय कर्डिलेंसाठी माघार घेणाऱ्या माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे लवकरच भाजपात प्रवेश करतील व विधान परिषदेची उमेदवारी भाजपकडून त्यांना दिली जाईल अशी चर्चा आज सुरू होती. याबाबत खुद्द भाजप तसेच प्राजक्त यांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही मात्र त्यांचे समर्थकांकडून सुरू असलेली जल्लोषाची तयारी या महितीला दुजोरा देत आहे.

वयाची चाळीशी गाठूनही ऐंशी-नव्वदीत जन्मलेली पिढी तरूण कशी? GenZ शोधत असलेलं उत्तर सापडलं

दरम्यान दिवंगत माजी आमदार अरुणकाका जगताप राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेवर आमदार होते. मात्र, सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपच्या जागा जास्त आहे. यामुळे भाजप काय निर्णय घेणार तसेच कोणाच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपकडून कदम तर राष्ट्रवादीकडून जगताप मैदानात

विधान परिषदेच्या या जागेवर सत्यजित कदम, भानुदास बेरड, वसंत लोढा यांच्यासह राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असलेले माजी खासदार सुजय विखे पाटील हेही इच्छुक आहेत. तसेच राष्ट्रवादीकडून चंद्रशेखर घुले, यांच्यासह आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप हे देखील स्पर्धेत आहे. भाजपने या जागेवर दावा केला असल्याने महायुतीमध्ये तिकीट वाटपावरून इच्छुकांमधील सुरू असलेली रस्सीखेच व मित्रपक्ष यांची मनधरणी करून उमेदवार निच्छित करणे हे मोठे आव्हान असणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp