Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विद्यार्थ्यांना शाळांकडूनच पुस्तके खरेदीची सक्ती; तक्रार आल्यास कारवाई, सरकारचा इशारा

विद्यार्थ्यांना शाळांकडूनच पुस्तके खरेदीची सक्ती; तक्रार आल्यास कारवाई, सरकारचा इशारा

Letsupp 3 weeks ago

Schools forcing students to buy books by themselves government warns of action if complaints are received : राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची शालेय साहित्य खरेदीसाठी मोठी धावपळ सुरू आहे.

मात्र, अनेक खासगी आणि स्वयंअर्थसहाय्य शाळांकडून विद्यार्थ्यांना शाळेने सांगितलेल्या ठरावीक दुकानातूनच पुस्तके, वह्या आणि इतर साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाल्यानंतर सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे.

पुण्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी स्वतंत्र एसपीव्ही स्थापन करा; आमदार हेमंत रासनेंची विधानसभेत मागणी

या विषयावर उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही शाळेला पालकांना विशिष्ट दुकानातूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास शालेय शिक्षण विभागाकडून चौकशी करून संबंधित संस्थांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल. यापूर्वी काही शाळांना नोटिसाही बजावण्यात आल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

मुंबईतील मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी सहायक आयुक्तांसह चौघांचे चौकशीसापेक्ष निलंबन

राज्यातील अनेक खासगी तसेच Central Board of Secondary Education संलग्न शाळांमध्ये वह्या, पुस्तके आणि इतर साहित्य बाजारभावापेक्षा अधिक दराने विकले जात असल्याची बाबही चर्चेत आली. त्यामुळे पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची चिंता सदस्यांनी व्यक्त केली.

Khadakwasla Dam : पुणेकरांच्या चिंतेत भर, खडकवासला धरणात 10 वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा

या प्रकरणावर सभागृहात सविस्तर चर्चा आणि गदारोळही झाला. त्यानंतर शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अशा शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. ही समिती कधी कार्यरत होणार आणि तिच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कितपत प्रभावी कारवाई होणार, याकडे आता पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp