Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आदर्श शिक्षक किरण पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या हस्ते सन्मान

आदर्श शिक्षक किरण पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या हस्ते सन्मान

Live Trends News 2 weeks ago

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे लाडली (ता. धरणगाव) येथील रहिवासी आणि कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल, जळगाव येथील आदर्श शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, नागपूर यांच्या वतीने राज्यस्तरीय सन्मानपत्राने गौरव झाल्यानंतर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक तथा निजी सचिव नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्यामुळे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात नवलसिंगराजे पाटील यांनी शाल, श्रीफळ, टोपी, स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू देऊन किरण विठ्ठल पाटील यांचा सन्मान केला. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. या वेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी बोलताना नवलसिंगराजे पाटील यांनी आदर्श शिक्षक किरण पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. "पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या उल्लेखनीय आणि उज्ज्वल कार्याची विशेष दखल घेतली असून त्यांनी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन पाठवले आहे. शिक्षण क्षेत्रात केलेले योगदान प्रेरणादायी असून अशा शिक्षकांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो," असे ते म्हणाले.

किरण विठ्ठल पाटील यांनीही या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पुढेही सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. शिक्षकांना मिळणारा असा सन्मान हा केवळ वैयक्तिक गौरव नसून संपूर्ण शिक्षकवर्गासाठी प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या गौरव सोहळ्याला बापूसो आणि भगवान पाटील, ॲड. भरत पाटील, बापू पाटील, आर्यराज पाटील, पवन पाटील, धीरज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी किरण पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News