Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महापूजा!

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महापूजा!

Live Trends News 3 weeks ago

ळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अंगारकी चतुर्थीच्या पावन पर्वावर, जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेल्या पद्मालय येथे भक्तीचा मळा फुलला आहे. आज पहाटे ४ वाजता अत्यंत मंगलमय वातावरणात जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते श्री गणरायाचा अभिषेक आणि विधिवत महापूजा संपन्न झाली.

अद्वैत संगम: डाव्या आणि उजव्या सोंडेचे दर्शन :
पद्मालय हे गणपतीचे अत्यंत प्राचीन स्थान मानले जाते. विशेष म्हणजे, डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी विराजमान असलेले हे देशातील एकमेव मंदिर असल्याने या स्थानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आज पहाटे केलेल्या आरतीने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.

विकासाचा घेतला आढावा :
पद्मालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या निमंत्रणावरून जिल्हाधिकारी रोहन घुगे या पूजेसाठी उपस्थित होते. पूजा संपन्न झाल्यानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. मंदिराचा ऐतिहासिक वारसा जपत सुरू असलेल्या विविध विकासकामांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. यावेळी देवस्थान ट्रस्टतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा शाल आणि श्री गणरायाची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

भाविकांच्या सोयीसाठी विशेष नियोजन :
उन्हाळ्याची तीव्र लाट लक्षात घेता, दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना त्रास होऊ नये म्हणून ट्रस्टतर्फे विशेष काळजी घेण्यात आली आहे. ठिकठिकाणी सावलीसाठी मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि कुलर्स लावण्यात आले आहेत.

या मंगल प्रसंगी तहसीलदार गोपाल पाटील, विश्वस्त आनंदराव पाटील, भिका पाटील, गोकुळ देशमुख, डॉ. पांडुरंग पिंगळे यांसह जैन इरिगेशनचे अनिल जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते. पुजारी गणेश वैद्य आणि केशवराव पुराणिक यांनी पौरोहित्य केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या पूजेनंतर मंदिर सर्व सामान्य भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News