Thursday, 21 Jan, 9.36 am Live Trends News

होम
अर्णव गोस्वामीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

मुंबई, वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसने अर्णव गोस्वामी याला अटक करण्यासाठी आणि देशाची गोपनीय माहिती देणार्‍या व्यक्तीचे नांव जाहीर करावे यासाठी आज त्याच्या रिपब्लिक टिव्हीच्या मुंबई येथील कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.

गली गली मे शोर है अर्णव गोस्वामी चोर है. अटक करा अटक करा अर्णव गोस्वामी याला अटक करा. अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने अर्णव गोस्वामी याच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढणार्‍या अर्णव गोस्वामी याच्याविरोधात देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही अर्णव गोस्वामी याला अटक करण्यासाठी आणि देशाची गोपनीय माहिती देणार्‍या व्यक्तीचे नांव जाहीर करावे यासाठी आज त्याच्या रिपब्लिक टिव्हीच्या मुंबई येथील कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.

दरम्यान अर्णव गोस्वामी याला गोपनीय माहिती मिळाली आणि त्याने चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी उपयोग केला ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करावी व गृहमंत्री अमित शहा यांनी यावर खुलासा करावा अशी मागणी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी केली तर राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी अर्णव गोस्वामी याला ही गोपनीय माहिती कुणी पुरवली याची माहिती उघड करावी अशी मागणी माध्यमांशी बोलताना केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prev Post

राजकीय हवा बदललीय, भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात; अनिल देशमुखांचा दावा

Next Post

प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यात "किसान तिरंगा रॅली व रेल रोको आंदोलन

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News
Top