Thursday, 29 Jul, 2.21 pm Live Trends News

होम
भोलाणे येथे वृद्धावर कुऱ्हाडीने वार ; चार जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । नातवाने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या घरावर शेण फेकल्याच्या कारणावरून ६६ वर्षीय व्यक्तीला एकाने कुर्‍हाडीने वार करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील भोलाणे येथे घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आत्माराम बुधो कोळी (वय-६६) रा. भोलाणे ता.जि.जळगाव हे आपल्या मुले व नातवांसोबत राहतात. मंगळवारी २७ जुलै रेाजी सांयकाळी ७ वाजता त्यांच्या नातवाने गल्लीत राहणारा विनोद प्रल्‍हाद कोळी यांच्या घरावर शेण फेकले त्या कारणावरून विनोद कोळी याने हातातील कुर्‍हाडीने आत्माराम कोळी यांच्या मांडीवर व उजव्या हातावर वार करून गंभीर दुखापत केली. तर दिपाली विनोद कोळी, मिराबाई प्रल्‍हाद कोळी व पुंडलिक भावलाल कोळी सर्व राहणार भोलाणे ता.जि.जळगाव यांनी यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आत्माराम कोळी यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून विनोद कोळी, दिपाली कोळी, मिराबाई कोळी आणि पुंडलिक कोळी यांच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक बापू कोळी करीत आहे.

Prev Post

नाथाभाऊंच्या जावयांचे संगीत उद्योगात पदार्पण; पहिला अल्बम लवकरच होणार प्रदर्शीत !

Next Post

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News
Top