Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

Live Trends News 1 week ago

ळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । माता आणि नवजात बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या जागतिक स्तनपान सप्ताहाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रसूती व स्त्रीरोग विभागात उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.

१ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहाच्या माध्यमातून स्तनपानाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि समाजामध्ये याबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्रसूती व स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया अर्वीकर, डॉ. वैभव पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस सोनवणे, डॉ. मृदूला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी, डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. साक्षी पटवारी, डॉ. संस्कृती भिरूड, डॉ. सिद्धी संके, पूजा गजरे, प्रतिक्षा जुमडे यांच्यासह विभागातील प्राध्यापक, निवासी डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी स्तनपान हे नवजात बालकाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. जन्मानंतरच्या पहिल्या तासात बालकाला स्तनपान देणे तसेच पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपानावर भर देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी यावेळी अधोरेखित केले. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त रुग्णालयामध्ये विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी समुपदेशन सत्रे, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, पोस्टर सादरीकरण, आरोग्य शिक्षण कार्यक्रम, प्रश्नोत्तर सत्रे तसेच स्तनपानाच्या योग्य पद्धतींबाबत माहिती देणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या माता तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही स्तनपानाचे फायदे, बालकाच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम आणि स्तनपान करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या माध्यमातून समाजात स्तनपानाबाबत असलेल्या गैरसमज दूर करून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी स्तनपान ही बालकासाठी निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी असून प्रत्येक आईने त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे सांगितले. बालकाच्या निरोगी भविष्यासाठी स्तनपानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. माया अर्वीकर यांनी माता आणि बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी स्तनपान अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने स्तनपान केल्यास बालकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांमुळे माता, कुटुंबीय आणि समाजामध्ये स्तनपानाबाबत अधिक जागरूकता निर्माण होऊन बाल आरोग्य सुधारण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News